कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

आडाळी एमआयडीसी’वर उद्या सावंतवाडीत चर्चा

*🛑आडाळी एमआयडीसी’वर उद्या सावंतवाडीत चर्चा*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२१:-* आडाळी एमआयडीसी स्थानिक विकास समिती आणि घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग यांच्यावतीने ‘आडाळी एमआयडीसी : अपेक्षा आणि वास्तव’ या विषयावर चर्चात्मक परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. सावंतवाडी येथील आरपीडी हायस्कूलच्या सभागृहात रविवार २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होईल, अशी माहिती समितीचे अध्यक्ष पराग गावकर व घुंगुरकाठीचे अध्यक्ष सतीश लळीत यांनी दिली. आडाळी एमआयडीसी औद्योगिक क्षेत्राबाबत चाललेल्या दिरंगाईकडे लक्ष वेधण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. राज्य शासनाने दहा वर्षांपूर्वी दोडामार्ग तालुक्यातील आडाळी येथे एमआयडीसी औद्योगिक क्षेत्राचा प्रकल्प जाहीर केला. ग्रामस्थांनी या प्रकल्पाचे स्वागत करून सर्व प्रकारचे सहकार्य करुन ७२० एकर जमीन एमआयडीसीला दिली. मात्र, गेली दहाहून अधिक वर्षे या औद्योगिक क्षेत्राचे कामकाज वेगवेगळ्या कारणांमुळे रखडत आहे. दोडामार्ग तालुका हा निसर्गसंपन्न असला तरी औद्योगिकदृष्ट्या मागास आहे. येथील शेकडो तरुण रोज
गोव्यात कामधंद्यासाठी जातात. त्या सर्वांना स्थानिकरित्या रोजगार उपलब्ध होईल, अशी सर्वांची अपेक्षा होती. परंतु अनुभव आणि वास्तव मात्र वेगळे आहे. हे वास्तव सर्वांसमोर आणण्यासाठी हा कार्यक्रम होत आहे. असे ते म्हणाले,
आडाळी एमआयडीसी स्थानिक विकास समिती आणि घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग ही सेवाभावी संस्था एमआयडीसीचे काम मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांच्या गाठीभेटी, निवेदने, उपोषण, अर्जविनंती, आडाळी ते बांदा असा आठ किलोमीटरचा लॉन्ग मार्च अशा वेगवेगळ्या स्तरावर या कामाचा पाठपुरावा आम्ही करीत आलो. जमीन खरेदी करुन आठ वर्षे झाली, तरी अद्याप एकही उद्योग आडाळीत सुरु झालेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. कार्यक्रमात सतीश लळीत प्रास्ताविक, तर समितीचे अध्यक्ष व आडाळीचे सरपंच पराग गावकर चर्चासत्राचे बीजभाषण करतील. यात कायदेतज्ञ अॅड. संदीप निंबाळकर, उद्योजक नाना कशाळीकर, कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे कार्यवाह अॅड. नकुल पार्सेकर, पत्रकार शिवप्रसाद देसाई, व्यापारी संघटनेचे बांदा येथील पदाधिकारी अभय सातार्डेकर यांचा समावेश आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!