आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 सिंधुदुर्ग जिल्ह्यला अमली पदार्थांच विळखा, राजकीय वरदहस्ताने चालतोय खेळ

🛑 रातोरात मालामाल होण्याची किमया फक्त अवैध धंद्यातूनच घडू शकते

🛑 राजकीय कवच कुंडले असल्याने पोलिस मुख्य सुत्रधारां पर्यंत पोहचू शकत नाहीत

🛑 पोलीस प्रशासनाच्या दारातच छेडावे लागेल प्राणांतिक उपोषण ; अवैध पैशाच्या जोरावर संघटीत गुन्हेगारी वाढीस

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ संपादकीय : सीताराम गावडे

🎴सिंधुदुर्ग,दि -२१ :-

सिंधुदुर्ग जिल्हा हा चरस गांजाच्या विळख्यातून कसा सुटणार हा यक्ष प्रश्न सध्या सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे,एका शेतकरी कुटुंबातील बारावीत शिकणारा मुलगा जेव्हा या व्यसनाच्या आहारी जातो व त्या विद्यार्थ्यांचे आई वडील माझ्या कार्यालयात येऊन माझे कौतुक करून साहेब कुठेतरी हे थांबले पाहिजे ,आमचा एकुलता एक वंशाचा दिवा कसा त्याच्या आहारी गेला ?त्याला कोणी नेले? हे काही समजले नाही ,आता तो आमच्या पूर्णपणे हाताबाहेर गेला आहे साहेब यातून काहीतरी मार्ग काढा आणि याचं समुळ उच्चाटन करा अशी विनवणी त्या पालकांनी केल्यावर माझे हृदय पाघळले, डोळ्यातून अश्रू टपकले, गेली अनेक वर्ष मी गोव्यातील विषारी दारु ,चरस गांजा याविरुद्ध लढा देत आहे.

हा माझा लढा एकाकी होता कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेलच्या माध्यमातून मी हा लढा देत असताना माझ्या संपादकीयला लाईक करणारे हजारो सापडले मात्र प्रत्यक्षात लढ्यात सहभागी होणारे हाताच्या बोटावर मोजण्या एवढेच माझ्या अनेक मित्रांनी मला फोन करून सांगितले सिताराम तू हे थांबव, ते लोक डेंजर आहेत ,तुला संसार आहे, मात्र मी शेळी होऊन शंभर दिवस जगण्यापेक्षा वाघ होऊन एक दिवस जगेन तत्त्वाने या विरोधात लढत राहिलो कोणीतरी सुरुवात करायला पाहिजे म्हणून ती सुरुवात मी केली.

त्याचा परिणाम बराच झाला, मोठ्या प्रमाणात या लोकांविरुद्ध गुन्हे दाखल होऊ लागलेत ,मात्र पोलीस गुन्हेगाराच्या मुळाशी न जाता जो विकताना सापडला, पिताना सापडला, ओढताना सापडल,त्याला अटक करून तकलादू कलम लावून तो जामिनावर सुटला पुढे काहीच नाही तो गुन्हा कायम तपासावर. माझे पोलिसांना एवढे सांगणे आहे की हे लोण जेव्हा तुमच्या घरापर्यंत पोहोचतील तेव्हा आगीत घर कसे होरपळते याची जाणीव तुम्हाला होईल पण तेव्हा वेळ निघून गेलेला असेल हे लक्षात ठेवा, कारण हे लोण कधी तुमच्या घरापर्यंत पोहोचणार हे तुम्हालाही समजणार नाही.

आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, बांदा, दोडामार्ग कुडाळ कणकवली ,वैभववाडी देवगड आधी भागात बाजारपेठेत दुकानात जशी सिगारेट मिळावी तसे अमली पदार्थ मिळू लागले आहेत ,पोलीस तकलादू कारवाई करतात व त्यांच्याकडून पुढे हप्ते ठरवून घेऊन गप्प बसतात, राजकारणी लोकही हातावर हात ठेवून गप्प बसतात या मागचे गणित माझ्यासारख्या सामान्य पत्रकाराला कधी समजले नाही.प्रत्येक वेळी बारीक सारीक गोष्टीवर उठाव करणाऱे राजकारणी गांजा चरस सारखे प्रकार सिंधुदुर्गात होत असताना मूग गिळून गप्प का आहेत हा आमचा सवाल आहे,या अवैद्य मार्गाने मिळणाऱ्या पैशाच्या जोरावर कॉलेज मुलांना विकत घेणं आपली गॅंग तयार करणे, असे प्रकार घडू लागले आहेत आणि याला राजकीय वरदहस्त असल्याशिवाय एवढे धाडस कोणी करू शकत नाही असे आमचे ठाम मत आहे.

सत्ताधारी कोणीतरी राजकीय पक्ष या मुख्य मोहरक्याच्या पाठीशी असावा या निष्कर्षापर्यंत आम्ही पोहोचलो, मात्र हा राजकीय कवच कुंडले घेऊन अवैध धंदे करणारा मोहरक्या कोण? त्याने सिंधुदुर्गात काय प्रकार केले? कशाप्रकारे पैसा उधळला? याचा लेखाजोखा जसजशी माहिती मिळेल तस तसा आम्ही मांडत राहू हे मात्र शंभर टक्के सूर्यप्रकाश एवढे सत्य आहे, कारण आम्हाला थांबवण्याची ताकद परमेश्वर सोडून कोणातही नाही.कोणाच्या दबावाला,दहशतीला बळी न पडता आम्ही आमचे कार्य चालूच ठेऊ.

या लेखाचे प्रयोजन एवढ्या साठीच आहे की जे पालक माझ्याकडे आले त्यांचे घरची परिस्थिती व त्यांनी इथपर्यंत मुलाला शिकवलेली परिस्थिती पाहता‌ गरिबीतून शिकून वर आलेल्या मुलाची झालेली अवस्था आई वडिलांनी कथन केल्यावर मनाला वेदना झाल्या त्यावेळी मला आठवला कोलगावातील प्रकार , पंधरा दिवसापूर्वी कोलगाव मध्ये युवकांना गांजा सिगारेट मधून ओढताना काही लोकांनी पाहिले त्यावर ते पळून गेले लोकांनी उठाव केल्यावर पोलिसांनी त्यांना अटक केली व त्यांना जामिनही झाला पोलीसांनी त्यांनी तो गांजा कोठून आणला त्यांना कोणी पुरवला या मुळापर्यंत गेले नाहीत, किंबहुना ते कधीच जात नाही, अनेक वेळा सावंतवाडीत तीन तीन किलो गांजा सापडला मात्र याचा म्होरक्या कधीच सापडला नाही ,आणि तो कधीच सापडत नाही . जेव्हा कुंपणच शेत खाऊ लागते तेव्हा संरक्षण तरी कोण करणार हा प्रश्न उभा राहतो, ज्या यंत्रणेवर आम्ही विश्वास ठेवतो ती यंत्रणाच जर पोखरलेली असेल तर असे प्रकार सर्रास घडणारच व सिंधुदुर्गातील युवा पिढी बरबाद होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.

आज सर्रास कॉलेजची मुले निरजन स्थळी जाऊन सिगारेट मध्ये अफू गांजा चरस घालून ओढत बसतात ही मुले अशा प्रकारे नशेच्या आहारी जात असताना आम्हाला उघड्या डोळ्यांनी पहावे लागते यासारखे दुसरे दुर्दैव नाही व यासाठी नेमलेली यंत्रणा ही कुचकामी ठरत असल्याने हे प्रकार वाढीस लागले आहेत ,कोणाचातरी राजकीय दबाव असल्यानेच हे प्रकार वाढीस लागले असावेत असा आमचा दाट संशय आहे, सावंतवाडीत गेल्या चार वर्षात अनेक गांजाचे गुन्हे दाखल करण्यात आले मात्र त्यातून निष्पन्न काही झाले नाही, कॉलेज मुलांकडे कॉलेजच्या आवारात आढळलेला गांजा तो कोठून आला याचा तपास पोलीस करू शकत नाहीत हे का होत नाही हे पडलेले कोडे आहे.

या अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन व्हायचे असेल तर वृक्षाच्या मुळाशीच घाव घालावा लागेल म्हणजे फांद्या आपोआप खाली येतील, यांचा जो मुख्य मोहरक्या आहे त्यांच्यापर्यंत पोहोचून त्याला जेर बंद करून या अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन करणे ही काळाची गरज आहे नाहीतर काळ आपल्याला कधीच माफ करणार नाही ,हे सर्वच राजकीय पक्षांनी पोलीस प्रशासनाने ध्यानात ठेवावे . त्यांना हा सूचक इशारा आहे अवैध धंदे चरस गांजा ,अफू ,गोवा बनावटी दारू हे असेच चालू राहिले तर एके दिवशी आम्हालाच उठाव करून पोलीस प्रशासनाच्या दारात उपोषणाला बसावे लागेल त्यावेळी सोबत कोण असेल याची परवा न करता परिणामाची चिंता न बाळता ते उपोषण प्राणांतिक असेल हे संबंधित यंत्रणेने ध्यानी ठेवावे. महाविद्यालय मुलांची कॉलेजची दप्तरे तपासली तर भयानव सत्य बाहेर पडेल हे मी विश्वासाने सांगतो हवेत बाण मारत नाही, कित्येक पालकांना आपली मुले कॉलेजला जाऊन काय करतात? ती कुठे असतात? कॉलेज मध्ये पोहचलीत काय?हे काहीच माहिती नसते त्यामुळे या गोष्टीवर पालकांनी सतर्क राहून लक्ष ठेवणे गरजेचे आहे. वाईट एवढ्याच गोष्टीचे वाटते म्हाताऱ्या मेल्याचे दुःख नाही काळ सोकावतोय आमचा या प्रकरणी सखोल तपास चालू आहे जर चुकून या मध्ये एखादा राजकीय पक्ष असेल आणि त्या गुन्हेगाराला पाठीशी घालत असेल तर त्या पक्षाचे पितळ उघडे पाडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!