वेर्ले समता नगर येथील मारहाण प्रकरणी सहाही जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणार- पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण
*🛑वेर्ले समता नगर येथील मारहाण प्रकरणी सहाही जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणार- पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२०:-* वेर्ले समता नगर येथील नामदेव न्हानू कदम व श्रीमती यशोदा न्हानू कदम यांना सुनील सिताराम कदम सुकाजी मनोहर कदम, रवी रामचंद्र कदम, दुर्वेश सिताराम कदम ,लक्ष्मण शिवराम कदम, एकनाथ भिवा कदम या सर्वांनी रात्रीच्या वेळी मारहाण केल्याची तक्रार सावंतवाडी पोलीस ठाण्यात नामदेव कदम यांनी दिली आहे सदरच्या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणार असल्याचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी कोकण लाईव्ह शी बोलताना सांगितले. याबाबत अधिक माहिती अशी की वेर्ले समता नगर येथे राहणारे नामदेव न्हानू कदम यांनी आपल्या मित्राने जेवणासाठी बोलावले म्हणून जेवणासाठी गेले असता तिथे पूर्वीचा वाद उरकून काढून नामदेव कदम याला वरील सहाही जणांनी मारहाण करण्यास सुरुवात केली ,तिथे झालेला आरडाओरडा ऐकून त्याची आई यशोदा कदम ही मुलाला वाचविण्यासाठी धावत गेली या झटापटीत तिलाही मारहाण करण्यात आली असे तक्रारीत म्हटले आहे. संबंधितां विरोधात सावंतवाडी पोलीस ठाण्यात अदाखलपत्र गुन्हा दाखल करण्यात आला, मात्र आपण संबंधित पोलीस ठाणे अंमलदाराला सहा नावे सांगत असताना ठाणे अंमलदारांनी तीनच नावे घेतली म्हणून ठाणे अंमलदाराच्या या कृती विरोधात नामदेव कदम यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला, त्या तक्रारदारीच्या अनुषंगाने सहाही जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक अमोलन चव्हाण यांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल शी बोलताना सांगितले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

