स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचे अस्तित्व धोक्यात !
*🛑स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचे अस्तित्व धोक्यात !*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴ओरोस, दि-१८:-* विद्यार्थी पटसंख्येवर शिक्षक संच मान्यात तसेच कंत्राटी शिक्षक भरती यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचे अस्तित्व संपविण्याचा घाट शासनाने घातला आहे. त्यामुळे हे निर्णय तात्काळ रद्द करावेत, यासाठी सर्व शिक्षक संघटनांनी असहकार आंदोलन पुकारण्याचा इशारा दिला आहे. न्याय मिळेपर्यंत काळी फीत लावून काम करून विरोध दर्शवला जाणार आहे. सर्व व्हॉटस्अॅप ग्रुपमधून बाहेर पडून असहकार पुकारला जाणार आहे. २५ सप्टेंबर रोजी किरकोळ रजा घेऊन पालकांसह प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा काढला जाईल, असे स्पष्ट केले आहे. विद्यार्थी आधारित शिक्षक संचमान्यता व कंत्राटी शिक्षक भरतीचा शासन निर्णय रद्द होणे या व इतर प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने राज्यातील सर्व शिक्षक संघटनांची निर्धार बैठक नुकतीच शिक्षक भवन पुणे येथे झाली. यावेळी आता ठोस भूमिका घेण्याचे निश्चित करण्यात आले असल्याची माहिती अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्य संयुक्त चिटणीस म. ल. देसाई यांनी दिली.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळा, शिक्षण, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांच्या संबंधाने शासनाकडून सतत दुर्लक्ष होत आहे. सोबतच शिक्षण हक्क कायदा २००९ मधील तरतुदीस विसंगत अशा १५ मार्च २०२४, ५ सप्टेंबर २०२४ च्या शासन निर्णयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांचे अस्तित्वच संपणार आहे. यासह अन्य मागण्यांच्या सोडवणुकी संबंधाने अनुकूल निर्णय घेण्याच्या बाबतीत शासन स्तरावर उदासीनता आहे. त्यामुळेच आंदोलन पुकारण्याचा एकमुखी निर्णय निर्धार बैठकीत घेण्यात आला असल्याचे म. ल. देसाई यांनी सांगितले. १५ मार्च २०२४ चा संचमान्यता शासन निर्णय रद्द करावा. २० किंवा २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांच्या बाबतीत कार्यरत शिक्षकाचे एक पद बंद करण्याचा व कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त, अन्य नियुक्ती देण्याचा ५ सप्टेंबर २०२४ चा शासन निर्णय रद्द करावा. आधारकार्ड आधारित शिक्षक पद निर्धारण धोरण रद्द करावे आदी मागण्या प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

