कोकणदोडामार्ग

दुचाकी व बलेरो पिकअप या भिषण अपघातात दोघांचा मृत्यू

*दुचाकी व बलेरो पिकअप या भिषण अपघातात दोघांचा मृत्यू*

दोडामार्ग दि १७-: वायंगणतड येथे दुचाकी व बोलेरोपिकअप यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला. घोटगेवाडी येथील संतोष शेटकर (वय ५२) व तिलारी येथील आलमारी सोच (वय ५०) अशी मृतांची नावे आहेत. त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आदम नाईकवाडी (रा. साटेली भेडशी) या मद्यधुंद वाहन चालकावर कठोर कारवाई करा, अन्यथा आम्ही सर्व घोटगेवाडी ग्रामस्थ रस्त्यावर उतरू, असा इशारा सायंकाळी घोटगेवाडी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दोडामार्ग पोलिसांना दिला आहे. दरम्यान आदम हुसेन नाईकवाडी या चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.
वायंगणतड येथे मंगळवारी सकाळी दुचाकी व बोलेरो पिकअप गाडीचा भीषण अपघात झाला. मद्य धुंद अवस्थेत भरधाव वेगाने पिकअप चालवल्याने पिकअप वरील ताबा सुटून हा अपघात झाला. अपघातानंतर पिकअप पलटी झाला. यावेळी पिकअपमध्ये एक महिला व एक मुलगा होता. ते दोघेही सुखरूप आहेत. या अपघातात संतोष शेटकर यांचा उपचारापूर्वी तर व त् अलमारी सोझ यांचा बांबोळी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांनी तिलारीतून साटेली भेडशीत येण्यासाठी शेटकर यांच्याकडे लिफ्ट मागितली होती. ती मागितली नसती तर कदाचित त्यांचा मृत्यू टळला असता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!