लक्षद्वीप बेटावर हेमा सरदेसाई कडून गोवा आणि लक्षद्वीपच्या विद्यार्थ्यांनी घेतले संगीताचे मौल्यवान धडे

*🛑लक्षद्वीप बेटावर हेमा सरदेसाई कडून गोवा आणि लक्षद्वीपच्या विद्यार्थ्यांनी घेतले संगीताचे मौल्यवान धडे**

*🛑गोवा आणि लक्षद्वीपमधील २८ तरुण संगीत विद्यार्थ्यांनी बंगाराम रिसॉर्ट येथे प्रख्यात गायिका हेमा सरदेसाई यांच्यासोबत एका विशेष संगीत सत्रात घेतला भाग,*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴पणजी, दि-१७:-* पणजी, सप्टेंबर २०२४: लक्षद्वीप ट्यूरिझमच्या विद्यमान सहयोगाने गोवा स्थित फ्लाय९१ या विमान सेवेने गोव्यातील संगीत शिकणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी लक्षद्वीप बेटावर संगीतमय कार्यक्रम अथवा सत्र आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी गोवा आणि लक्षद्वीपमधील एकूण २८ तरुण संगीत विद्यार्थी सहभागी होते.
कार्यक्रमासाठी गोव्यातून एकूण ११ विध्यार्थी आणि पुरस्कार विजेते गायिका हेमा सरदेसाई फ्लाय९१ च्या विमानसेवेचा आस्वाद घेत बेटावर गेले होते. १३ सप्टेंबर रोजी हा संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संगीत शिकणाऱ्या या मुलांना हा एक शैक्षणिक असा अनुभव होता. गोव्यातील ११ विद्यार्थ्यांसोबत १७ लक्षद्वीपातील स्थानिक विध्यार्थी होते. बंगाराम रिसॉर्टमध्ये त्यांची राहण्याची सुविधा होती. या वर्षाच्या सुरुवातीला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर या रिसॉर्टला महत्त्व प्राप्त झाले आहे. यापूर्वी २०२३ मध्ये G-20 शिखर परिषदेसह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रमुख कार्यक्रमांचे आयोजन इथे झाले होते.११ ते १५ वयोगटातील विद्यार्थ्यांचा बेटावर हा एक खास दिवस होता, जिथे ते हेमा सरदेसाई यांच्यासोबत एक मजेदार संगीत सत्रात सहभागी झाले. हेमा सरदेसाई ही गोव्यातील प्रसिद्ध गायिका आहे जिने आवारा भँवरे (सपने,१९९६), ये दिल दिवाना (परदेस,१९९७) आणि बादल पे पांव है (चकदे! इंडिया, २००७) या सारख्या लोकप्रिय बॉलिवूड चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. मुलांनी फक्त संगीताचा आनंदच नाही तर हेमा सरदेसाई कडून मौल्यवान धडे सुद्धा घेतले, ज्याच्यामुळे त्यांच्यासाठी हा कार्यक्रम रोमांचक आणि संस्मरणीय अनुभव बनला.
चॅरिटी म्युझिकल जॅम दरम्यान बेटावरील शाळेतील विद्यार्थ्यांनी अनेक सांस्कृतिक उपक्रमही सादर केले. फ्लाय९१चे सीईओ आणि एमडी मनोज चाको कार्यक्रमाबद्दल बोलताना म्हणाले की, प्रतिभावन कलाकार हेमा सरदेसाई यांच्याकडून शिकत असताना तरुणांना सुंदर लक्षद्वीप बेटांचे अन्वेषण करण्याची संधी देण्यासाठी ते उत्साहित आहेत. मुलांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यात मदत करणे आणि समाजाला सकारात्मक दिशेने घेऊन जाणे हा या उपक्रमाचा उद्देश होता. सरदेसाई यांच्या मार्गदर्शनामुळे मुलांना खूप फायदा होईल असा विश्वास चाकोने वर्तवला.मुलांनी संगीताद्वारे प्रेरित व्हावे, लक्षद्वीपच्या समुद्रकिना-याचा, सौंदर्याचा, शांततेचा आनंद लुटावा आणि याच सुरमई वातावरणात संगीत अनुभवावे अशी या कार्यक्रमाची संकल्पना होती. फ्लाय९१ ने लक्षद्वीप टुरिझमसोबत एक नवीन प्रकारचा प्रवास अनुभव तयार केला आहे. या प्रवासात अभ्यागतांना प्रेक्षणीय स्थळांचा आनंद लुटता येईल.फ्लाय९१ आणि लक्षद्वीप टुरिझम मधल्या या प्रवास अनुभवाची सुरुवात गोवा आणि लक्षद्वीपमधील तरुण संगीतकारांना शिकण्याची आणि वाढण्याची विशेष संधी देऊन त्यांच्यासाठी अविस्मरणीय अनुभव निर्माण करून झाली.संगीत शिकू इच्छिणाऱ्या तरुण मुलांना प्रेरणा देण्याच्या या उदात्त कारणासाठी फ्लाय९१ सोबत भागीदारी करताना मला आनंद होत आहे. गोव्यात राहणे, गोव्यातील विमान कंपनीला सपोर्ट करणे आणि तिथल्या तरुण प्रतिभेला महत्त्व देणे, फ्लाय९१ ची वचनबद्धता माझ्या स्वतःच्या मूल्ये आणि उत्कटतेने प्रतिध्वनित आहे. फ्लाय९१ ने मला लक्षद्वीप येण्याची संधी दिली ज्याच्या माध्यमातून मला ही शांतता अनुभवायला मिळाली आणि देवाचे अस्तित्व देखील जाणवले,” हेमा सरदेसाई म्हणाल्या. कार्यक्रमास विद्याथ्यांचा वा इतरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पणजी-स्थित डॉन बॉस्को हायस्कूलचे इयत्ता नववीचे विद्यार्थी आणि शाळेतील गायनाचे सदस्य रुबान नायर यांच्या मते, सरदेसाई यांच्यासोबत घालवलेल्या वेळेमुळे त्यांना स्टेजवर आत्मविश्वासाचे महत्त्व समजण्यास मदत झाली. “स्टेजवर गाताना खूप आत्मविश्वास बाळगला पाहिजे, प्रेक्षकांपर्यंत पोचण्यासाठी तुमचा आवाज खणखणीत असणे महत्वाचे आहे असे मला जाणवले आहे,” तो पुढे म्हणाला. विद्यार्थ्यांसाठी हा एक चांगला अनुभव होता. हेमा सरदेसाई सारख्या सुप्रसिद्ध गायिका आपल्यात सामील झाल्यामुळे विद्यार्थ्यांना संगीताची नवीन रूपे पाहायला मदत होईल. तिचा सल्ला आणि गायनातील कौशल्य, आणि तरुणांना सुधारण्यास मदत करणे, यामुळे संपूर्ण सत्र सर्वांसाठी रोमांचक बनले,” असे गोवा स्थित शाळेतील गायन मंडळाचे संचालक अशर फर्नांडिस म्हणाले. हेमा सरदेसाई यांच्यासोबत संगीत गाण्याची संधी मिळाली यासाठी आम्ही खूप भाग्यवान आहोत. चॅरिटी म्युझिकल जॅम अप्रतिम होता,” असे सरकारी सीनियर बेसिक स्कूल अगत्तीची विद्यार्थिनी नमिरा कार्यक्रमाचा उत्साह प्रतिबिंबित करताना म्हणाली. अविस्मरणीय प्रवास देण्यासाठी फ्लाय९१ ने सातत्याने काम केले आहे. लक्षद्वीप सारख्या दुर्गम स्थळांना जोडत असलेल्या विमान कंपनीने विमान वाहतूक आणि प्रायोगिक प्रवास, विशेषत: प्रादेशिक केंद्रांना जोडण्यामध्ये सतत जोर दिला आहे. बेटाच्या मूळ सरोवरांच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेली संगीत संध्याकाळ हा एक जादुई अनुभव होता आणि या बेटाला भेट देणाऱ्या प्रवाशांना असे अनेक रोमांचक कार्यक्रम वा अनुभव मिळतील अशी अशा लक्षद्वीप टूरिझमच्या प्रवक्त्याने व्यक्त केली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!