कणकवलीकोकणमहाराष्ट्र

नांदगाव येथे दुचाकीच्या धडकेत एकजण जखमी

*🛑नांदगाव येथे दुचाकीच्या धडकेत एकजण जखमी*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-१६:-* महामार्गावरून जात असलेल्या दुचाकीची महामार्गाच्या बाजूला, पांढऱ्या रेषेच्या बाहेर उभ्या असलेल्या जतिन शंकर किल्लारे (३२, रा. विरार) यांना धडक बसली. नांदगाव येथे शनिवारी रात्री ९.३० वा. सुमारास झालेल्या या अपघातात जतिन यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली. याबाबत दुचाकीचालक संतोष चाळके (रा. बेळणे) याच्याविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जतिन यांच्या फिर्यादीनुसार, जतिन खासगी आरामबसचे चालक असून ते प्रवाशांना घेऊन वेंगुर्लेहून मुंबईला निघाले होते. शनिवारी रात्रीच्या सुमारास जेवणासाठी त्यांनी आरामबस नांदगाव येथे एका हॉटेलनजीक महामार्गाच्या बाजूला उभी केली होती. जेवण झाल्यानंतर जतिन हे महामार्ग ओलांडून पलिकडे जाऊन महामार्गाच्या पांढऱ्या रेषेबाहेर उभे होते. त्यावेळी या महामार्गाने जात असलेल्या, पांढऱ्या रेषेबाहेर आलेल्या अॅक्टिवा दुचाकीची (एमएच०७ एएफ६६५६) जतिन यांना धडक बसली. अपघातानंतर दुचाकीचालक संतोष तसेच जतिन यांचे सहचालक यांनी जतिन यांना खासगी रुग्णवावाहिकेद्वारे कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. अपघातात जतिन यांचा डावा पाय फॅक्चर झाला असल्याचे फिर्यादित म्हटले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥८🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!