चुलीत आग पेटविताना वृद्धा गंभीर जखमी
*🛑चुलीत आग पेटविताना वृद्धा गंभीर जखमी*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह*
*🎴कुडाळ, दि-१३:-* पहाटे पाणी तापविण्यासाठी चुलीत आग पेटवित असताना साळगाव- गायचोरवाडी येथील काशीबाई बापू गायचोर (७५) यांच्या साडीने पेट घेतला. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना गुरुवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. मुलगा मुंबईला जाणार असल्याने त्याला आंघोळीसाठी गरम पाणी देण्याकरिता काशीबाई या गुरुवारी पहाटे ४.३० वाजता चुलीत आग पेटविण्यासाठी गेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी आग पेटविण्यासाठी रॉकेल ओतले. त्यावेळी आगीचा भडका उडून त्यांच्या साडीने पेट घेतला. तेव्हा त्यांनी आरडा- ओरडा केला असता, घरातील माणसांनी तिथे धाव घेतली व आग विझविण्याचा प्रयत्न केला. आग विझविण्यापूर्वी त्या गंभीर भाजल्या. त्यानंतर त्यांना कुडाळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार करुन त्यांना जिल्हा रुग्णालय (ओरोस) येथे अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
