कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

प्लास्टिक कचऱ्याचे करायचे काय

*🛑प्लास्टिक कचऱ्याचे करायचे काय*

*🛑प्लॅस्टिकमुक्तीसाठी हवा नागरिकांचा सहभाग*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :सुनील आचरेकर**

*🎴सिंधुदुर्ग, दि-१३:-* पर्यावरणाची हानी करण्यात प्रमुख घटक ठरलेल्या प्लॅस्टिक वर बंदीचा अध्यादेश मार्च २०१८ मध्ये राज्यसरकारने काढल्यानंतर जून पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांनी धडाक्यात प्लास्टिक पिशव्या ग्राहकांना देणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईस सुरुवात केली. त्यानंतर नागरिकांनी काही प्रमाणात प्लास्टिक पिशव्या नेणे टाळत कापडी पिशव्या वापरू लागले. बंदीनंतर काही दिवसांनी सरकारने विशिष्ट प्रकारचे प्लास्टिक‌ बंदीतून वगळल्याने संभ्रम निर्माण झाला. काही प्रमाणात या मोहिमेला यशही आले परंतु हळूहळू कारवाईचे थंडावलेने प्लॅस्टिकचा वापर पून्हा सुरू झाला. आज विविध खाद्यपदार्थ, विविध प्रकारच्या वस्तू या सर्व प्लॅस्टिकच्या आवरणात असतात. बाजरातही पुन्हा प्लास्टिक.पिशव्यांचा वापर खुलेहामपणे सुरू झाल्याचा दिसतो. त्यामुळे प्लॅस्टिक मुक्ती दुरुच राहिली असून घरोघरी साचणार् या प्लॅस्टिक कचऱ्याचे करायचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर प्रामुख्याने भाजी बाजार, मच्छीमार्केट, छोटे -छोटे विक्रेते फेरीवाले यांच्याकडून मोठ्या प्रमाणात होतो. प्लॅस्टिक पिशव्यांबरोबरच ‌‌प्लॅस्टिक चमचे, द्रोण, ग्लास याचाही वापर मोठ्या प्रमाणावर होतो. आज बहुतांशी बेकरी ॲटम, किराणा वस्तू या प्लॅस्टिकच्या पिशवीत असतात. प्लॅस्टिक पिशवी ही सहज साध्य असल्याने त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. राज्य शासनाने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतल्यानंतर ५० मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या वापरावर बंदी घालण्यात आली. अशा पिशव्या विक्रेत्यांवर नगरपालिका ग्रामपंचायतींने कारवाई सुरू केली.थर्माकोलच्या वस्तू वापरावरील बंदी घालण्यात आली. त्यासाठी दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईच्या धसक्याने अनेक विक्रेत्यांनी कागदी पिशव्यांचा वापर सुरू केला. नागरिकांनी ही कापडी पिशव्या वापरण्यास सुरुवात केली. काही महिने ही मोहीम काही प्रमाणात यशस्वी झाली.मात्र कारवाई थंडावताच व्यापारी,किराणा माल विक्रेते, हॉटेलचालक, खाद्यपदार्थ विक्रेते, भाजी व्यापारी मच्छी विक्रेते यांनी पुन्हा प्लास्टिकचा वापर सुरू केला‌ आहे.सर्वच वस्तू बाजारात प्लॅस्टिकच्या पिशवीत मिळत असल्याने घरोघरी मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक साचते. शासनाने २०२२ ‌ मध्ये सिंगल युज प्लास्टिक वापरावर बंदी घातली होती. मात्र, ती ही मोहीम थंडावली.प्लॅस्टिक कचऱ्याचे विघटन जमिनीत होत नाही. त्यामुळे प्लास्टिकचा कचरा नदी, नाले, रस्ते बाजूला, महामार्गाच्या बाजूला आणि समुद्रकिनारी टाकला जातो. शहरामध्ये नाचणाऱ्या कचऱ्यामध्ये ५० टक्के होऊन अधिक कचरा हा प्लॅस्टिकचा असतो. विविध उत्पादनांमध्ये प्लॅस्टिकचा कचरा होत असल्याने कचऱ्यात, नाल्यांमध्ये प्लॅस्टिक अधिक दिसते. त्यामुळे पर्यावरणावरही त्याचे दुष्परिणाम दिसत आहेत.प्लॅस्टिक झाल्यामुळे हवेचे प्रदूषण होत आहे. त्यामुळे या प्लॅस्टिकचा नायनाट होणे आवश्यक‌ आहे. राज्यशासनाने प्लॅस्टिक वर बंदी आणली मात्र प्लास्टिकचे उत्पादन काही थांबले नाही. त्याची छुप्या पद्धतीने विक्री सुरूच आहे. शिवाय प्लास्टिकला पर्याय ठरू शकणाऱ्या वस्तू उपलब्ध होत नसल्यामुळेही नागरिक पुन्हा प्लास्टिककडे वळू लागल्याचे ‌ विक्रेत्यांचे म्हणणे आहे . सिंधुदुर्गात प्लास्टिकचा वापर जनजागृतीसाठी अनेक संस्था काम करत आहेत. प्रशासन ही वेळोवेळी पथनाट्य व अन्यउपक्रमातून जनजागृती करत असते. नागरिकांनी शक्य तेवढा प्लास्टिकचा वापर टाळाला पाहिजे.प्लॅस्टिक, थर्माकोलच्या वापरात पूर्वीच्या तुलनेत काही प्रमाणात घट झाली असली तरीही बंदी १०० टक्के अंमलात आलेली नाही. शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातही प्लॅस्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे साचलेल्या कचऱ्याचे करायचे काय असा प्रश्न मात्र निर्माण झाला आहे यामुळे साचणारा प्लास्टिकचा कचरा एक तर जाळला जातो किंवा तो नदी नाल्यामध्ये टाकला जातो आज जिल्ह्यातील बहुतांशी नदी नाले प्लॅस्टिक कचऱ्यामुळे प्रदूषित झाले आहेत प्रभावी कारवाई,लोकजागृती आणि लोकसहभागाच्या माध्यमातून प्लॅस्टिक मुक्तीचे लक्ष सहज शक्य आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!