कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

*अक्षय साईल याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्यांना पकडण्यात पोलीस अपयशी ठरल्याने महेश सारंग बसणार बेमूदत उपोषणास

*अक्षय साईल याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्यांना पकडण्यात पोलीस अपयशी ठरल्याने महेश सारंग बसणार बेमूदत उपोषणास*

*गुरुवार दिनांक १२ सप्टेंबर पासून महेश सारंग छेडणार उपोषण*

सावंतवाडी –
अक्षय जर्नादन साईल यच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यास पोलिस अपयशी ठरल्याने पोलिस निरीक्षक सावंतवाडी यांच्या कार्यालया समोर भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग गुरुवार दिनांक १२ सप्टेंबर पासून बेमूदत उपोषणास छेडणार आहेत.
कोलगाव भोम वाडी येथील अक्षय जनार्दन साहिल यांच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या आरोपींना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी याबाबतचे निवेदन देऊन पाच दिवस उलटले तरी दोन संशयीत सोडून व्यतिरिक्त आरोपींना अद्याप पर्यंत अटक करण्यात आलेली नाही ,संशयित आरोपींचे फोन नंबर ,त्यांचे लोकेशन, पोलीस अद्याप पर्यंत मिळवण्यात अपयशी ठरले आहे ,संबंधित आरोपी हे अवैध धंद्याशी निगडित असल्याने त्यांना पकडण्यात पोलिस अपयशी ठरत ठरत असल्याने महेश सारंग पोलीस प्रशासनाच्या विरोधात आमरण उपोषणाला बसणार आहेत
अक्षय साईल याच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या संशयीत आरोपिंना त्वरीत अटक करण्यात यावी या मागणीसाठी सारंग गुरुवार दिनांक १२-,९ -२०२४ सावंतवाडी पोलीस ठाण्या समोर उपोषणास बसणार आहे.जो पर्यंत आरोपिला अटक करण्यात येत नाही तो पर्यंत उपोषण सोडणार नाही असा इशारा ममेश सारंग यांनी पोलिस प्रशासनाला दिला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!