कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

मळगाव ग्रामस्थांचे ग्रामसचिवालयासमोर आंदोलन.

*मळगाव ग्रामस्थांचे ग्रामसचिवालयासमोर आंदोलन…*

*सहा महिने गावातील स्ट्रीट लाईट बंद असल्याने ग्रामस्थ संतप्त…*

मळगाव :-

येथील संपूर्ण गावातील रोडवरील स्ट्रीट लाईट गेले सहा महिने कर्मचारी अभावी बंद असल्याने ग्रामस्थ चांगलेचं आक्रमक झाले आहेत,
आज त्यांनी ग्रामसचिवालयासमोर आंदोलन करून सरपंचाना चांगलेचं धारेवर धरले आहे,
गणेशोत्सवाला सुरुवात झाली तरीही गावातील रस्ते स्ट्रीट लाईट अभावी अंधारात आहेत, त्यामुळे ग्रामस्थांना राञीच्या अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, अनेक लोकांनी तक्रारी करूनही ग्रामपंचायततर्फे कोणतीही दखल घेतली जात नाही, यामुळे ग्रामस्थांचा राग अनावर झाल्याने आज गावातील लोकांनी ग्रामसचिवालयासमोर एकञ येत ग्रामपंचायत सरपंच, सदस्यांविरोधात ठिय्या आंदोलन केले…
दोन दिवसात स्ट्रीट लाईट सुरू न केल्यास ग्रामपंचायत बंद करु असा इशारा ग्रामस्थांनी दिला…
यावेळी मळगाव ग्रामस्थ पांडुरंग राऊळ, पांडुरंग उर्फ बाप्पा नाटेकर, महेंद्र पेडणेकर, ऍड. निधी दाभोळकर, सिद्धेश आजगावकर, निखिल राऊळ, महेश राऊळ, सुदेश राऊळ, सुमेश राऊळ, संदीप राऊळ, सागर राणे, विश्वनाथ गोसावी, सहदेव राऊळ, विकास नाईक, सुरज गवंडे, बाळा राणे, नाना राणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!