सांस्कृतिक केंद्राचे मटणमार्केट होऊ नये म्हणून ९३/८ चा आधार; दोन महिन्यात लोकार्पण करू; महाविकास आघाडी
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण,दि.१४: सांस्कृतिक केंद्र कामाची चौकशी सुरू असताना नवीन कामांना सभागृहात थेट मंजुरी देणे योग्य नव्हते. त्यामुळे ९३/८ कलमाचा आधार घेऊन जिल्हाधीकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवण्याची मागणी केली. त्यांनी प्रस्ताव स्वीकारला तर सर्व अडचणीतून मार्ग निघेल. सांस्कृतिक केंद्राचे मटणमार्केट होऊ नये आणि केंद्राचे लोकार्पण लवकरात लवकर होईल हाच शुद्ध हेतू होता. त्यामुळे भष्ट्राचाराला पाठीशी घालण्याचा मुद्दाच उपस्थित होत नसल्याचे महाविकास आघाडीने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
चिपळूण शहरातील इंदिरागांधी सांस्कृतिक केंद्रावरून महाविकास आघाडीत फूट पडून काँग्रेस आणि अपक्ष नगरसेवकांनी थेट भष्ट्राचाराचे आरोप केल्यानंतर महाविकास आघाडीने गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
यावेळी शिवसेनेचे गट नेते उमेश सकपाळ, आरोग्य सभापती शशिकांत मोदी, बांधकाम सभापती मनोज शिंदे, राष्ट्रवादी गटनेते बिलाल पालकर, नगरसेविका सुरय्या फकीर, स्वाती दांडेकर, वर्षा जगुष्टे, शिवानी पवार उपस्थित होते.
यावेळी उमेश सकपाळ म्हणाले महाविकास आघाडीतील आमचे मित्र अविनाश केळसकर यांचा अभ्यास फार मोठा आहे. ते विद्वान आहेत. त्यांना एखादा पुरस्कार दिला पाहिजे. त्यांच्या अभ्यासानुसार या विषयाबाबत ते जे काही बोलत आहेत ते दिशाभूल करणारे आहे. आघाडीतील काही सदस्यांना चुकीची माहिती देऊन त्यांनी दिशाभूल केली आहे. आम्ही जो ठराव मांडला तो शुद्ध आणि कायदेशीर मार्गाने आहे. सांस्कृतिक केंद्राच्या कामात गैरव्यवहार आणि भष्ट्राचार झाला असेल तर त्याला शिक्षा ही होणारच आहे. कोणालाही पाठीशी घालणार नाही. परंतु सांस्कृतिक केंद्राची इमारत रखडून पडू नये. मटणमार्केट इमारत सारखी त्याची अवस्था होऊ नये म्हणून ९३/८ हा पर्याय आम्ही काढला. असेही ते म्हणाले.
शशिकांत मोदी म्हणाले, सांस्कृतिक केंद्राच्या कामाबाबत चौकशी सुरू आहे. एखाद्या कामाची चौकशी सुरू असताना त्याच प्रकल्पाच्या उर्वरित कामासाठी मंजुरी देणे किंवा निविदा प्रक्रिया राबवणे म्हणजे चौकशीत बाधा आणण्यासारखे झाले असते. जिल्हाधिकारी यांच्याकडूनच चौकशी सुरू असल्याने हा संपूर्ण विषय त्यांच्याकडेच सुपूर्द केल्यास ते योग्य निर्णय घेतील. त्यांनी ९३/८ चा प्रस्ताव स्वीकारला तर त्यांच्या आदेशानुसार पुढील उर्वरित कामे होतील. त्यांनी प्रस्ताव फेटाळला तर चौकशीमधील तथ्य समोर येईल आशा दोन्ही मार्गाचा विचार करून पूर्ण अभ्यास करून आम्ही तो ठराव केला. मग भष्ट्राचाराला पाठीशी घालण्याचा किंवा गाठ अधिक घट्ट करण्याचा प्रश्न येतोच कुठे? असेही ते म्हणाले.
उमेश सकपाळ म्हणाले, येत्या महिनाभरात हे सर्व विषय मार्गी लागतील त्यासाठी महाविकास आघाडी सतत पाठपुरावा करेल. ना. उदय सामंत, ना. अनिल परब यांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यामुळे येत्या दोन महिन्यात इंदिरागांधी सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण होईल आणि दोन महिन्यात जर हे काम झाले नाही, तर मी माझ्या पदाचा राजीनामा देऊन बाजूला होईन असा थेट इशाराच त्यांनी यावेळी दिला.
महाविकास आघाडी एकसंघ आणि मजबूत असून त्यामध्ये कोणतीही फूट पडलेली नाही. काही मतभेद असतील तर एकत्र बसून सोडवले जातील. महाविकास आघाडी कायम राहणार आहे. असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*
*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*
*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..
*_🙋🏼♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*
*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

