कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

शेतकऱ्यांनी ई पीक नोंदणीला प्राधान्य द्यावे शेतकरी संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे

*🛑शेतकऱ्यांनी ई पीक नोंदणीला प्राधान्य द्यावे शेतकरी संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-०३:-* शासकीय हमीभावाने भात खरेदी आणि नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई पीक नोंदणी महत्त्वाची आहे. त्यामुळे भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी ई पीक नोंदणी करण्याचे आवाहन सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे यांनी केले. सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ मर्या., सावंतवाडी या संस्थेची ६२वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष श्री. प्रमोद गावडे यांचे अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी उपाध्यक्ष रघुनाथ रेडकर, संचालक प्रमोद सावंत, अभिमन्यू लोंढे, प्रवीण देसाई, ज्ञानेश्वर परब, दत्ताराम हरमलकर, विनायक राऊळ, आनारोजीन लोबो,आत्माराम गावडे, रश्मी निर्गुण आदी उपस्थित होते.
संस्थेस आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये १० लाख ६३ हजार ७५६ रुपये एवढा नफा झाला. संस्थेने आर्थिक उलाढालीत वाढ केली असून दि.३१ मार्च २०२४ अखेर बैंक कर्जाची पुर्ण फेड केलेली आहे. यावेळी सभेत संस्थेचे जेष्ठ सभासद श्री. गोपाळ नाईक (माजगांव), श्री. मनोहर राऊळ (मळगांव), श्री. तातोबा गवस(गेळे), श्री. अशोक दळवी(माजगांव) यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सभासदांच्या गुणवंत मुलांचा सत्कार करण्यात आला.
तसेच खरीप हंगाम २०२३-२४ मध्ये ३००० क्विंटलच्या वर भात खरेदी केलेल्या केंद्रांचा सत्कार करण्यात आला, यात भात केंद्र कोलगांव विकास सोसा. यांचे चेअरमन श्री. विरेंद्र धुरी, सचिव श्री.रामा म्हैसकर व भात केंद्र सावंतवाडी चे केंद्र प्रमुख श्री. सागर गांवकर यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. संस्थेचा कार्यअहवाल सेक्रेटरी महेश परब यांनी सादर केला.
सभेस संस्थेचे संचालक, संस्था सभासद प्रतिनिधी व व्यक्तिसभासद उपस्थित होते. सभा खेळीमेळीत होणेकरीता सभासद श्री. बाबल ठाकूर, श्री. अरुण गावडे, श्री. अनंत परब, श्री. सुनिल देसाई, श्री. अशोक दळवी, श्री.बापू सावंत, श्री. प्रमोद परब व श्री. तातोबा गवस यांनी सभा कामकाजात भाग घेतला. संस्थेचे चेअरमन मा. श्री. प्रमोद गावडे व व्हा. चेअरमन मा.श्री. रघुनाथ रेडकर यांनी उपस्थित सभासदांचे आभार मानले.
१)सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या वतीने जेष्ठ सभासद अशोक दळवी यांचा सत्कार करताना अध्यक्ष प्रमोद गावडे व अन्य
२) कोलगाव विकास संस्था चेअरमन विरेंद्र धुरी यांचा सत्कार करताना
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!