कोकणदोडामार्गमहाराष्ट्र

बापूसाहेब देसाई विद्यालय उसप प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. महिंद्र अविनाश खांडेकर सर जीवन गौरव व‌ स्मृति शिल्प ज्ञानज्योती राज्यस्तरीय पुरस्कार २०२४ ने सन्मानित

*🛑बापूसाहेब देसाई विद्यालय उसप प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. महिंद्र अविनाश खांडेकर सर जीवन गौरव व‌ स्मृति शिल्प ज्ञानज्योती राज्यस्तरीय पुरस्कार २०२४ ने सन्मानित*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी : प्रांजल गवस*

*🎴दोडामार्ग, दि- ०३:-* दोडामार्ग तालुका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बापूसाहेब देसाईविद्यालय उसप प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. महिंद्र अविनाश खांडेकर सर यांची आविष्कार फौंडेशन इंडिया ( कोल्हापूर -महाराष्ट्र राज्य ) या संस्थेच्या द्वारा सन 2024 च्या “राज्यस्तरीय ज्ञानज्योती पुरस्कारासाठी ” निवड करण्यात आली.सांस्कृतिक तसेच वि, पद्मावती, स्वामी विवेकानंद पुतळ्याजवळ,विद्येचे माहेर घर पुणे येथे श्री. महिंद्र अविनाश खांडेकर सर यांना राज्यस्तरीय ज्ञानज्योती पुरस्काराने श्री. सचिन वायकुळे संचालक स्मार्ट भाषण कला अकॅडेमी बार्शी जि. सोलापूर यांच्या हस्ते आणि प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक श्री. सुरेश पाटोळे, कर्मवीरायण चित्रपटाचे डायरेक्टर श्री. धनंजय भावलेकर, चाटे शिक्षण समूह पुणे संचालक श्री. फुलचंद चाटे, मास्टर ट्रेनर यशदा पुणेचे श्री. विवेक गुरव , मुख्य आयोजक श्री. संजय पवार संस्थापक अविष्कार फौंडेशन निमंत्रक श्री. डॉ. प्रकाश चौधरी पुणे जिल्हा अध्यक्ष आविष्कार फौंडेशन यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानीत करण्यात आले. याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींकडून श्री. खांडेकर सर यांचे अभिनंदन केले जात आहे. विशेष म्हणजे उसप पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ उसप संचलित बापूसाहेब देसाई विद्यालय उसप प्रशालेचेमुख्याध्यापक श्री. महिंद्र अविनाश खांडेकर सर यांना आविष्कार फौंडेशन सारख्या एका नामांकित संस्थेचा राज्यस्तरीय ज्ञानज्योती पुरस्कार जाहीर होणे ही प्रशाला तथा संस्थेसाठी आनंददायी तथा अभिमानास्पद बाब आहे.
श्री. महिंद्र अविनाशखांडेकर सर हे गेली १७ वर्षे विज्ञान आणि गणित विषयाचे अध्यापन करत आहेत. ते ११ वर्षे सहाय्यक शिक्षक व ०६ वर्ष प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कुशल सेवा तथा उत्तम प्रशासक म्हणून कर्तव्य बजावत आहेत. सन १९८६ -८७ साली महाराष्ट्र शासनाकडून उत्कृष्ट शिस्तबद्ध सुव्यवस्थापीत माध्यमिक शाळा म्हणून 5 शिक्षक कार्यरत असताना बापूसाहेब देसाई विद्यालय उसप प्रशालेचा गौरव करण्यात आलेल्या प्रशालेचा प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यभार केवळ 01 शिक्षक यांच्या साथीने स्वीकारणे हे खूप आव्हानात्मक काम होते. पण ते ही आव्हान लिलया पेलले उसप पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कार्यकारिणीच्या सुयोग्य मार्गदर्शन आणि समन्वय पर प्रेरणादायी विचार प्रणालीमुळे शिक्षक -शिक्षकेतर यांनी शालेय गुणवत्ता वाढीच्या अंतःकरण पुर्वक घेतलेल्या ध्यासामुळे एक दर्जेदार सातत्यपूर्ण गुणवत्ता संपन्न शिक्षण देणारी. गेली 05 वर्षे सलग माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता दहावीचा 100 % निकाल असणारी शाळा म्हणून ओळखली जाते. शासकीय रेखाकला प्रमाणपत्र परीक्षेचा प्रशालेचा सलग 100 % निकाल. एन. एन. एम. एस. परीक्षेत यशस्वी सहभाग, विज्ञान मेळावा, विज्ञान नाटिका, विज्ञान प्रदर्शना अंतर्गत मॉडेल निर्मिती, प्रश्नमंजुषा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा तसेच इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनात वर्किंग मॉडेल निर्मितीत प्रशालेचा यशस्वी सहभाग आहे. सदर सहभागी विद्यार्थ्यांना सर्व शिक्षकांच्या साथीने एक कुशल मार्गदर्शक म्हणून श्री.खांडेकर सरांची महत्वपूर्ण भूमिका राहिली आहे. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक या क्षेत्रात सरांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली असून ते दोडामार्ग तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत.. सदर राज्यस्तरीय ज्ञानज्योती पुरस्कार 2024 हा माझ्या उसप पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ उसप, संस्था कार्यकारिणी, शाळा समिती,शाळा व्यस्थापन समिती, माता पालक संघ तसेच बापूसाहेब देसाई विद्यालय उसप प्रशालेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आजी-माजी पालक वर्ग, शिक्षण प्रेमी, जिल्हा मुख्याध्यापक संघ, शिक्षक भारती सिंधुदुर्ग मित्र परिवार,दोडामार्ग तालुका मुख्याध्यापक संघ, दोडामार्ग शिक्षक वर्ग यांच्या सांघिक नियोजनात्मक मार्गदर्शनाचे फलीत आहे. आपण निमित्त मात्र आहोत असे प्रतिपादन पुरस्कार स्वीकारताना आपले मनोगत प्र.मुख्याध्यापक श्री. खांडेकर सर यांनी व्यक्त केले आहे. राज्यस्तरीय ज्ञानज्योती पुरस्कार २०२४ प्राप्त झाल्याबद्दल बापूसाहेब देसाई विद्यालय उसप प्रशालेचे प्र.मुख्याध्यापक श्री. महिंद्र अविनाश खांडेकर सर यांचे उसप पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संस्था अध्यक्ष मा.श्री. चंद्रकांत दत्ताराम मळीक, सचिव मा.श्री. लक्ष्मण सखाराम नाईक,उपाध्यक्ष मा.श्री. रामकृष्ण वासुदेव गवस, खजिनदार मा.श्री. प्रदीप हरिश्चंद्र गवस, कार्यकारिणी संचालक मा.श्री. संतोष अंकुश केरकर, मा.श्री. दशरथ विठ्ठल मोरजकर, मा.श्री. सुभाष भिवा परब , मा.श्री. अजित गोविंद कळणेकर, मा.श्री. वासू आपा नाईक, मा.श्री. उदय नारायण गवस, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, शाळा समिती,शाळा व्यवस्थापन समिती, पालक8 शिक्षक संघ, माता पालक संघ सदस्य, पंचक्रोशी तील शिक्षणप्रेमी, आजी – माजी विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे. त्यांच्या या प्रेरणादायी यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!