अपिलार्थीला परिपूर्ण माहिती न दिल्याने राज्य माहिती आयुक्तांकडून सेंट्रल उर्दू हायस्कूलच्या मुख्याध्यापकां विरोधात केलेले अपिल काढले निकाली
*🛑अपिलार्थीला परिपूर्ण माहिती न दिल्याने राज्य माहिती आयुक्तांकडून सेंट्रल उर्दू हायस्कूलच्या मुख्याध्यापकां विरोधात केलेले अपिल काढले निकाली*
*🛑मुख्याध्यापकां विरोधात केलेली शास्तीची कारवाईही रद्द*
*🛑नासीर शेख यांने केलेले अपील राज्य माहिती आयुक्त यांनी काढले निकाली*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-०३:-* शहरातील सेंट्रल उर्दू हायस्कूल मधील नवीन शिक्षक भरती प्रकरणी परिपूर्ण माहिती अपिलार्थीला न दिल्याने संबंधित हायस्कूलचे जन माहिती अधिकारी तथा मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी खुलासा मागवला होता अन्यथा प्रतिदिन 250 रुपये इतक्या शास्तीची आकारणी का करू नये अशा प्रकारची नोटीस कोकण भवन येथील कोंकण खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त शेखर चेन्ने यांनी जारी केली होती ती नोटीस मुख्याध्यापक यांनी समाधान कारक खुलासा केल्याने रद्द करण्यात आली आहे.
दरम्यान याबाबतची परिपूर्ण माहिती आठ जून 2024 च्या सुनावणीच्या वेळी स्वतः उपस्थित राहून जन माहिती आयोगाकडे सादर करण्याचे आदेशही देण्यात आले होते त्या प्रमाणे मुख्याध्यापक यांनी समाधान कारक खुलासा केल्याने शास्तीची कारवाई रद्द करुन अपिल निकाली काढण्यात आले. याबाबतचे वृत्त असे की सावंतवाडी शहरातील सावंतवाडी मर्कजी जमात मुंबई संस्थेचे उपाध्यक्ष नासिर अहमद इस्माईल शेख यांनी माहितीच्या अधिकारात सावंतवाडी येथील सेंट्रल उर्दू हायस्कूल यांच्याकडे नवीन शिक्षक भरती प्रकरणी माहिती मागवली होती याबाबतचा माहिती अर्ज 5 ऑक्टोबर 2021 ला सादर केला होता यावर प्रथम अपील 25 नोव्हेंबर 2021 ला झाले दरम्यान अपिलार्थी शेख यांना परिपूर्ण माहिती दिली नाही तर दिलेली माहिती मोघम स्वरूपाची असल्याची बाब राज्य माहिती आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सेंट्रल उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक इकदाल दस्तगीर मुलाणी यांना राज्य माहिती आयुक्तांनी अपिल अपिलार्थी यांच्या पाच ऑक्टोबर 2021 च्या माहिती अर्जाला अनुसरून विहित मुदतीत माहिती पुरवल्याचा कोणताही पुरावा आयोगात सादर केला नाही म्हणून त्यांच्याविरुद्ध माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत २० (१) अन्वये प्रति दिवस रुपये 250 (अधिकतम रुपये 25000 पर्यंत) इतक्या शास्तीची आकारणी का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा मागविला आहे तसेच याबाबतचा लेखी खुलासा 8 जून 2024 रोजी च्या सुनावणीच्या वेळी स्वतः उपस्थित राहून आयोगाकडे सादर करावा अन्यथा शास्त्रीचे आदेश कायम केले जातील अशी नोटीस जारी केली होती या अनुषंगाने मुख्याध्यापक सेंट्रल उर्दू हायस्कूल यांनी उपस्थित राहत खुलासा केला,केलेला खुलासा समाधान कारक असल्याने शास्तीची कारवाई रद्द करून नासीर शेख यांचे अपील निकाली काढण्यात आले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
