प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये घेण्यात येत असलेल्या शाळाबाह्य परीक्षांवर निर्बंध आणण्याची मनसेची जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्याकडे मागणी
*🛑प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये घेण्यात येत असलेल्या शाळाबाह्य परीक्षांवर निर्बंध आणण्याची मनसेची जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्याकडे मागणी*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-३१:-* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये गेली काहि वर्ष खाजगी शिक्षण संस्थांमार्फत शाळाबाह्य परीक्षा घेण्याचा अनेक खाजगी शिक्षण संस्थांमार्फत सपाटा लावण्यात आला असून या मुळे मुलांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत आहॆ. अनेक शाळा या खाजगी शिक्षण संस्थांच्या मागे फरफटत जात असल्याचे निदर्शनास येत आहॆ. ज्या खाजगी शिक्षण संस्थांमार्फत या परीक्षा घेण्यात येत आहेत त्या संस्थांपैकी अनेक संस्था या नोंदणीकृत नाहीत केवळ या शाळाबाह्य परीक्षांच्या नावावर विद्यार्थी वर्गाला वेठीस धरले जात असून परीक्षा शुल्काच्या नावाखाली भरमसाट फि आकारण्याचा व त्यातून पैसा कमावण्याचा नवीन गोरखधंदा सुरू करण्यात आलेला आहॆ व याला अनेक संस्था चालक बळी पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहॆ. अनेक पालक आपली आर्थिक परिस्थिती नसताना देखील केवळ नाईलाज म्हणून हे शुल्क जमा करून आपल्या मुलांना या परीक्षांना बसवत आहेत. आता तर पहिली व दुसरीच्या मुलांसाठी देखील अशा प्रकारच्या परीक्षा काहि जिल्ह्य़ाबाहेरील खाजगी संस्थांनी सुरू केल्या असून खेळण्या बागडण्याच्या वयात या मुलांना स्पर्धा परीक्षांच्या दावणीला बांधले जात आहॆ. स्पर्धा परीक्षा असाव्यात या परीक्षांना मनसेचा सरसकट विरोध नाही मात्र त्या कोणत्या वयाच्या मुलांसाठी असाव्यात या बाबत शासनाने देखील आपले धोरण ठरविणे आवश्यक व गरजेचे आहॆ. वेगवेगळ्या नावाने खाजगी शिक्षण संस्था चालवून त्यातून पैसा कमावणाऱ्या या मंडळींनी आता स्पर्धा परीक्षांच्या नावाखाली शिक्षकांना देखील वेठीस धरले आहॆ. तरी निदान पहिली ते तिसरी पर्यंतच्या मुलांना या शाळाबाह्य स्पर्धा परीक्षांमधून वगळण्यात यावे व अशा प्रकारच्या शाळाबाह्य स्पर्धा परीक्षांना पहिली ते तिसरी पर्यंतच्या मुलांना बसविण्यात येवू नये अशा प्रकारचे आदेश आपल्या अखत्यारीतील सर्व शाळांना देण्यात याव्यात अशा प्रकारचे लेखी निवेदन मनसे तर्फे देण्यात आले आहॆ. या वेळी जिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर ,धिरज परब ,महिला जिल्हाध्यक्ष मोनिका फर्नांडिस ,उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर ,सुधीर राऊळ ,गणेश वाईरकर ,राजू कासकर ,मिलिंद सावंत ,हेमंत जाधव ,शांताराम सादये ,चिन्मय नाडकर्णी ,सतीश आकेरकर ,सागर जाधव,आत्माराम बांदेकर ,यतिन माजगावकर ,अक्षय जोशी व इतर मनसे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

