लक्झरीमधील बॅगेतील दागिने चोरीस
*🛑लक्झरीमधील बॅगेतील दागिने चोरीस*
*🛑नांदगावची घटना : मुंबईकडे जात होता व्यापारी*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-३१:-* गोव्याहून मुंबईकडे खासगी आरामबसने प्रवास करणाऱ्या दागिन्याच्या व्यापाऱ्याच्या बॅगमधील सुमारे ६० हजार रु. किमतीचे दागिने व रोख रक्कम अज्ञाताने लांबविले. लक्झरी जेवणासाठी नांदगाव येथे थांबली असताना ही घटना गुरुवार २९ ऑगस्टला रात्री ९.१५ ते ९.३० या कालावधीत घडली. याबाबत अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कणकवली पोलिसांत भैयासाहेब मोतीराम मोरे यांनी दाखल फिर्यादीनुसार, मोरे यांचा एक ग्रॅम सोन्याचे दागिने बनवून व्यापाऱ्यांना वितरित करण्याचा व्यवसाय आहे. डॉल्फिन या खासगी आरामबसने (एनएल०१ बी ६३००) व्यापारी भैय्यासाहेब मोरे (५४, रा. चारकोप, कांदिवली) हे गोव्याला दागिन्यांच्या वितरणासाठी गेले होते. त्यानंतर उरलेला माल घेऊन ते लक्झरीने गोव्याहून कांदिवली येथे जात होते. प्रवासादरम्यान नांदगाव येथील एका हॉटेलमध्ये बस जेवणासाठी थांबली.
मोरे हे हॉटेलमध्ये जेवायला गेले होते.
जेवण करून ते लक्झरीत आले असता त्यांच्या बाजूला बसलेल्या प्रवाशाने त्यांना त्यांची बॅग उघडी असल्याचे सांगितले. अज्ञात चोरट्याने त्यांची साखळीने बांधलेली सुटकेस कोणत्यातरी हत्याराने पेचून उघडली. सुटकेसमध्ये सुमारे ६० हजार किमतीच्या १ ग्रॅम सोन्याच्या २० नथी तसेच रोख तीन हजार अज्ञात चोरट्याने लांबविले. हे दागिने सुटकेसमध्ये डब्यात ठेवण्यात आले होते. या दागिन्यांबरोबर व्यापाऱ्याच्या काही पावत्याही होत्या. व्यापाऱ्याने याबाबत कल्पना देताच रात्री लक्झरी पोलीस ठाण्यात आणण्यात आली. मात्र, काहीही आढळून आले नाही. त्यानंतर लक्झरी रात्री उशिरा मुंबईकडे रवाना करण्यात आली. याबाबत भैय्यासाहेब मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, हवालदार चंद्रकांत झोरे करीत आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
