कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

जलक्रीडा केंद्राच्या परिसराचा गैरवापर

*🛑जलक्रीडा केंद्राच्या परिसराचा गैरवापर*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-३०:-* नगरपरिषदेचे मोती तलावाकाठचे जलक्रीडा केंद्र गेली कित्येक वर्षे बंद आहे. त्यामुळे या केंद्राच्या स्लॅबखालील इमारतीचा गैरवापर काही परप्रांतीय, वेडसर व्यक्ती निवाऱ्यासाठी करत आहेत. या स्लॅबखालील मोकळ्या जागेचा वापर रात्रीच्यावेळी मद्यपान, अन्य गैरमार्गासाठी होत असल्याच्या तक्रारी आहेत. किरकोळ वादातून या ठिकाणी मारामारीसारख्या घटनांतून तलावात पडून एखाद्याचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगरपरिषद प्रशासन व पोलीस यंत्रणेने जलक्रीडा केंद्र इमारतीला संरक्षक जाळी बसवून मुख्य दरवाजाला कुलूप लावण्याची गरज आहे. नगरपालिका प्रशासनाने या केंद्रासाठी सुरक्षा कर्मचारी ठेवावा. तर पोलीस यंत्रणेने गस्तीवर असताना या केंद्राच्या इमारतीकडे जाऊन खातरजमा करून संशयास्पद व्यक्ती आढळल्यास कारवाईची गरज आहे. मोती तलावातील जलक्रीडा केंद्र अनेक वर्षे बंद आहे. त्यामुळे केंद्राच्या इमारतीचा परप्रांतीय व्यक्ती, वेडसर व्यक्ती निवाऱ्यासाठी वापर करतात. तर या ठिकाणी मद्यप्राशन व अन्य गैरवापर होत आहेत. या इमारतीच्या मोकळ्या जागेत मोती तलावात जलक्रीडा सफरीसाठी वापरात नसलेल्या बोटी ठेवल्या आहेत. या बोटीमध्ये काही व्यक्तींनी आपला संसारच थाटला आहे. केंद्राच्या इमारतीकडे जाणारा मुख्य दरवाजा प्रशासनाकडून बंद केला जात नाही. शिवाय त्या ठिकाणी प्रशासनाकडून रात्रीच्यावेळी कोणतीही कारवाई होत नसल्याने परप्रांतीय व्यक्तींची संख्या वाढत आहे. या ठिकाणी मद्याच्या नशेत मारहाणीच्या घटना होऊ शकतात. पोलीस व नगरपरिषद प्रशासनाने गांभीर्याने सदर केंद्राच्या इमारतीला संरक्षक जाळी व मुख्य दरवाजाला कुलूप लावण्याची गरज आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!