कणकवलीराजकीयशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

सिंधुदुर्गातील इतर मागास प्रवर्गातील ‘वाणी’ समाजातील ‘वैश्य’ असे नोंद असलेल्या पुराव्यांना इतर मागास वर्गात दाखले मिळावेत..

▪️सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना शिवसेना संपर्कप्रमुख शंकर पार्सेकर यांचे निवेदन..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴सिंधुदुर्ग,दि.१४: जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्गातील ‘वाणी’ समाजातील ‘वैश्य’ असे नोंद असलेले पुरावे यांना इतर मागास वर्गात दाखले मिळावे याबाबतच्या मागणीचे निवेदन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना शिवसेना संपर्कप्रमुख शंकर पार्सेकर यांनी दिले.

श्री. पार्सेकर यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वाणी समाजातील लोकांना ‘वाणी’ या नोंद असलेल्या पुराव्या प्रमाणे इतर मागास वर्ग दाखले शासन निर्णय क्र. सीबीसी /१०/२००८ प्र. क्रमांक २३५/ मावक – ५ चा २१ जून २००८ निर्णय प्रमाणे इतर मागास प्रवर्गात दाखले देण्यात येतात. तसेच वाणी समाजातील ज्या दाखल्यावर वैश्यवाणी, वैश्य वाणी, वै वाणी,V वाणी, पानारी असे नोंद असलेल्या समाजबांधवांना शासन निर्णय क्रमांक सीआयआरसी- १०/ २००४/ सीसीआर ९/ मावक चा निर्णय १ मार्च २०१४ रोजी पासून इतर मागासवर्गीय (१९०) म्हणून दाखला देणार येतात, परंतु वाणी समाजातील काही लोकांच्या दाखल्यावर फक्त ‘वैश्य’ असा उल्लेख आहे ते वाणी समाजातील बांधव आहेत पण अशा लोकांना शासनाकडून वैश्य नोंद असलेल्यांना इतर मागासवर्गीय म्हणून दाखला देण्यात येत नाही. तरीपण या विषयात लक्ष देऊन वैश्य अशी नोंद असलेल्या समाजातील बांधवांना (१९०)प्रमाणे इतर मागासवर्गीय म्हणून दाखले देण्यात यावेत व समाज बांधव आरक्षणापासून शाळा, कॉलेज, नोकरीला वंचित होण्यापासून आपल्या समाज बांधवांना न्याय मिळवून द्यावा व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्गातील वाणी समाजातील ‘वैश्य’ असे नोंद असलेले पुरावे इतर मागास वर्गात दाखले मिळणे बाबत शिवसेना कणकवली तालुका संपर्कप्रमुख शंकर पार्सेकर यांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना निवेदनाद्वारे कळविले आहे.

*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*

*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*

*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..

*_🙋🏼‍♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*

*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!