कणकवलीराजकीयशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

मोदी सरकार “भारत नेट” योजनेच्या माध्यमातुन घर तेथे इंटरनेट देणार; आ.नितेश राणे

▪️प्रधानमंत्री मोदींचे डिझिटल इंडियाचे स्वप्न सिंधुदुर्गातून यशस्वी करू; आ.राणेंनी व्यक्त केला विश्वास

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली,दि.१४: मोदी सरकार “भारत नेट” योजनेच्या माध्यमातुन घर तेथे इंटरनेट देणार आहे. ही योजना सामान्य जनतेसाठी महत्वाकांक्षी आहे. या योजनेची सिंधुदुर्ग जिल्ह्यात यशस्वी अंमलबजावणी व्हावी आणि गावोगावी, घरोघरी इंटरनेट सुविधा मिळावी, यासाठी सर्वतोपरी सहकार्य प्रशासनाला केले जाईल. भारत नेटच्या माध्यमातुन प्रधानमंत्री मोदी यांचे डिझिटल इंडियाचे स्वप्न सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन यशस्वी करू असा विश्वास भाजपा आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.

ही योजना यशस्वी राबविण्यासाठी भारत नेटचे केंद्रीय अधिकारी तथा महाराष्ट्राचे प्रमुख लोकेश श्रीवास्तव यांना आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरावर निमंत्रित केले होते. आज आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवलीत प्रहार भवन येथे बैठक झाली.

यावेळी बीएसएनएलचे साहाय्यक टेकनेशीय ऑफिसर सुभाष कांबळे व भारत नेट चे तालुका प्रतिनिधी उपस्थित होते.

भारत नेट योजनेत शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र, रेशनिंग दुकान, ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय अशा ठिकाणी भारत नेट अंतर्गत मोफत इंटरनेट सेवा दिली जाणार आहे. त्याचा फायदा गावाला होणार आहे. त्यामुळे जोमाने ही योजना गावात गावात नेण्यासाठी कामाला लागा, जेथे आमची मदत लागेल, तेथे भाजपाचा कार्यकर्ता सहकार्य करेल. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा आहे, गावोगावी इंटरनेट असल्यास त्याचा फायदा पर्यटन व्यवसायला होईल. मात्र ही भारत नेट योजना बीएसएनएलच्या नेट वरून चालविताना येणाऱ्या अडचणी लक्षात घ्या, त्या सोडविण्यावर भर द्या. अशा सुचनाही यावेळी उपस्थितीत बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

सिंधुदुर्गातील ३६१ ग्रामपंचायतींसह दाट लोकवस्ती असलेल्या ठिकाणी बीएसएनएलच्या माध्यमातुन इंटरनेट सेवा पुरविणारे हॉटस्पॉट बसवले जाणार आहेत. तेथुन २०० मिटर अंतर परिसरात इंटरनेटची सुविधा ग्राहकांना मिळेल. अशी माहिती बीएसएनएलच्या अधिकार्‍यांनी आज दिली.

आमदार नीतेश राणे यांनी आज येथील प्रहार भवन येथे केंद्र सरकारच्या ‘भारत नेट’ तसेच जिल्ह्यातील इंटरनेट सेवेचा आढावा घेतला. यात भारत नेटचे लोकेश श्रीवास्तव आणि बीएसएनएलचे अधिकारी सुभाष कांबळे यांनी जिल्ह्यातील इंटरनेट सुविधांबाबतची माहिती दिली.
जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये बीएसएनएलच्यावतीने ओएफसी लाइन टाकुन तेथे ब्रॉडबँड सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे. आता या इंटरनेट सेवेची देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी आपले सरकार सेवा केंद्राकडे देण्यात आल्याची माहिती, भारत नेटचे लोकेश श्रीवास्तव यांनी दिली. तर बीबीएनएल व सीएससी याचा भारत नेट कार्यक्रमांतर्गत सिंधुदुर्गातील ३६१ ग्रामपंचायतीच्या ठिकाणी तसेच दाट लोकवस्ती असलेल्या भागात इंटरनेट हॉटस्पॉट बसविले जाणार आहेत. त्या माध्यमातुन ग्राहकांना इंटरनेट सेवा दिली जाणार असल्याचे बीएसएनएलचे श्री.कांबळे म्हणाले.

बीएसएनएलचे नेटवर्क कुठे आहे? आपल्या आसपास जरी मोबाईल लावला तरी फोन लागत नाही. ग्रामपंचायतमध्ये फायबर केबलने भारत नेट जोडलात तर बंद का? नरेंद्र मोदी यांचे स्वप्नं केव्हा साकार होणार ? सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे, पर्यटक नेटवर्क नसेल तर कसे येणार? महामार्गाचे काम सुरू असलेल्या ११ ग्रामपंचायती सोडल्या तर इतर ठिकाणी सुविधा मिळाली पाहिजे मात्र असे होत नाही. असे अनेक प्रश्न उपस्थित करून ते सोडविण्यासाठी पर्यायही आमदार नितेश राणे यांनी बैठकीत दिले. त्यात दिल्ली येथील केंद्रिय अधिकारी श्रीवास्तव यांनी येत्या महिन्याभरात सेवा सुरळीत करून देण्यासंदर्भात आश्वासन दिले.

दरम्यान, नितेश राणे यांनी जर ही सेवा सर्व सामान्य जनतेला मिळत नसेल, तर पंतप्रधानाचे उद्दिष्ट कसे साध्य होणार. या योजनेची माहिती जनतेपर्यंत गेली पाहिजे. आपला कोणताही प्रतिनिधी आपल्या पर्यंत पोहोचला नाही, तर सहकार्य कसे करायचे ? यापुढे जिल्ह्यातील तिन्ही मतदार संघातील आमदारांना माहिती द्या आणि त्यांचे सहकार्य घ्या. चांगल्या कामासाठी आपण आपल्या पाठीशी राहु असा विश्वास आम.नितेश राणे यांनी दिला.

*_💥सावंतवाडी शहरात तुकाराम परब यांचे दर्जेदार चिकन सेंटर.._💥*

           *🔥ग्रंथा चिकन सेंटर🔥*

_🌈आमच्या येथे बॉयलर व गावठी कोंबडी विकत मिळतील.._

*🤷🏻‍♂️आमचा पत्ता ⬇️*
प्रोप्रायटर – तुकाराम परब
पाटणकर-चौगुले तिठा, बिरोडकर टेंब, बाबा बिरोडकर मार्ग, न्यू सबनीस वाडा, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*💁🏻‍♂️मोबाईल नंबर ⬇️*
*_📱९४२०२६१५८४_*
*_📱९४०३७०१५८५_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!