रुग्णालय सुरक्षा रक्षकांचे पाच महिन्याचे मानधन थकीत
*🛑रुग्णालय सुरक्षा रक्षकांचे पाच महिन्याचे मानधन थकीत*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२८:-* जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांचे पाच महिन्यांचे मानधन थकित राहिल्याने सुरक्षारक्षकांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांचे मानधन रुग्णालय प्रशासनाकडून प्राप्त झालेले नाही. त्यामुळे रुग्णालयातील ८० सुरक्षा रक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. काहीजण उसनवार घेऊन कुटुंबाचा गाडा हाकत आहेत. काहींनी उदरनिर्वाहासाठी बँकांकडून कर्ज घेतले आहे. त्या कर्जाचे हप्ते व उसनवार घेतलेली रक्कम परतफेड करू शकत नाहीत. वेळेत थकित सर्व मानधन मिळाल्यास गणेशोत्सव साजरा करण्यास मोठी मदत होणार आहे. आरोग्य विभागाने शासकीय रुग्णालयातील ८० सुरक्षारक्षकांचे थकित पाच महिन्यांचे मानधन गणेशोत्सवापूर्वी खात्यात जमा करावे, अशी मागणी केली जात आहे. यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग सुरक्षा मंडळ विभागाने पाठपुरावा करूनही न्याय दिला जात नाही. त्यामुळे सुरक्षा रक्षकांमध्ये नाराजी आहे. 5 याबाबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण, – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, खासदार नारायण राणे, आमदार नीतेश राणे यांनी पाठपुरावा करून न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग सुरक्षा मंडळातर्फे गेली १३ वर्षे शासकीय रुग्णालयात सुरक्षा रक्षक म्हणून सेवेत आहेत. त्यांची तीन वर्षांची मुदत मार्चमध्ये संपली आहे. मुदतवाढीसाठी आरोग्य विभागाची प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही. हा प्रस्ताव मान्यतेसाठी प्रशासकीय मंत्रालयस्तरावर धूळ खात पडून आहे. सुरक्षारक्षक मंडळाकडून सतत पाठपुरावा होत आहे. त्यासाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी ही समस्या दूर करून वाढीव मुदतीच्या प्रस्तावाला दोन दिवसांत प्रशासकीय मान्यता दिल्यास मानधनाचा प्रश्न सुटू शकेल. यासाठी जिल्ह्यातील सर्व आमदार, मंत्री, खासदारांनी प्रयत्न करावेत. थकित पाच महिन्यांचे मानधन मिळवून दिल्यास सुरक्षा रक्षकांना दिलासा मिळणार आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
