चौकुळ कबुलायतदार गावकर प्रश्न पंधरा दिवसांत निकाली काढणार-मंत्री दिपक केसरकर
चौकुळ कबुलायतदार गावकर प्रश्न पंधरा दिवसांत निकाली काढणार-मंत्री दिपक केसरकर
जमीन प्रश्री कोण राजकारण करत हे सर्वांना माहिती
★ सावंतवाडी ता. २६-: चौकुळ गावचा जमीन प्रश्न हा येत्या पंधरा दिवसात निश्चितपणे मी सोडवणार आहे. या गावची समिती यांनी आपल्या गावचा आराखडा तयार करावा त्यानुसार जमिनीचे वाटप केले जाईल असे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
या गाव हा माझा जवळचा गाव आहे त्यामुळे या प्रश्नासंदर्भात मी गेली कित्येक वर्षापासून झगडत आहे तिन्ही गावांचा जमिनीचा प्रश्न निश्चितपणे निवडणूक आचारसंहितेपूर्वी सोडवला जाईल मात्र या जमीन प्रश्नात कोणी राजकारण करत आहे हे सर्वांना माहीत आहे असेही ते म्हणाले

