महिला आयोग आपल्या दारी’चे ३० रोजी आयोजन
*🛑महिला आयोग आपल्या दारी’चे ३० रोजी आयोजन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-२३:-* महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे कार्यालय मुंबई येथे असल्याने राज्यातील अनेक महिलांना मुंबई येथे पोहोचणे शक्य होत नाही. त्या अनुषंगाने महिलांना त्यांच्या तक्रारीबाबत स्थानिक स्तरावर आपले म्हणणे मांडता यावे, यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोग मुंबई यांनी दिलेल्या निर्देशानुसार ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमाद्वारे जिल्ह्यातील महिलांच्या तक्रारींचे स्थानिक स्तरावर निराकरण करण्यासाठी ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता नियोजन समिती सभागृह (नवीन), जिल्हाधिकारी कार्यालय सिधुदुर्ग येथे जनसुनावणी आयोजित केली असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी दिली आहे. या जनसुनावणीस आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर स्वतः उपस्थित राहणार आहेत. जिल्हाधिकारी किशोर तावडे, पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख तसेच कोकण विभाग महिला व बालविकास विभागीय उपआयुक्त हे देखील उपस्थित राहणार आहेत. या जनसुनावणीमध्ये तीन स्वतंत्र पॅनल्स तयार करण्यात येणार असून प्रत्येक पॅनेलमध्ये सदस्य म्हणून विधी
व न्याय प्राधिकरणाचे वकील, संरक्षण अधिकारी, पोलीस अधिकारी, महिला व मुलांचे सहाय्य कक्ष येथील समुपदेशक, सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या पॅनेलद्वारे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे मुंबई येथील विभागीय कार्यालयातील सिंधुदुर्ग जिल्हयाच्या प्राप्त तक्रारी व इतर सेवाभावी संस्थेचे समुपदेशन केंद्र यांच्याकडील प्रकरणांचे, भरोसा सेल-पोलीस अधीक्षक कार्यालय येथे प्राप्त तक्रारी तसेच ऐनवेळी जनसुनावणीचे ठिकाणी येणाऱ्या पिडीत महिलांचे तक्रारीचे निराकरण करण्यात येणार आहे. तक्रारीचे स्वरुप महिला केंद्रित कौटुंबिक, सामाजिक समस्या या प्रकारचे असावे व सदरील विषय न्यायप्रविष्ट नसावा. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती ‘सभागृह (नवीन) सिंधुदुर्ग येथे होणाऱ्या महिला जनसुनावणीच्यावेळी उपस्थित राहून जास्तीत जास्त पिडीत, समस्याग्रस्त महिलांनी ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी १८१ या महिला हेल्पलाइन क्रमांकावर अथवा ‘सखी वन स्टॉप सेंटर, ९२०९०७२७०९’ येथे संपर्क साधावा.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

