सातोळी-बावळाट येथे गाईंची अवैध वाहतूक रोखली
*🛑सातोळी-बावळाट येथे गाईंची अवैध वाहतूक रोखली*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴आंबोली, दि-२३:-* सातोळी-बावळाट पोलीस चेकपोस्टवर टेम्पोतून वाहतूक केल्या जाणाऱ्या सुमारे ४ लाख ४ हजार रुपये किमतीच्या गाई पोलिसांनी ताब्यात घेतल्या. ही कारवाई गुरुवारी रात्री पावणेतीन वाजण्याच्या सुमारास जिल्हा वाहतूक शाखेचे हवालदार प्रवीण सापळे, हवालदार अमोल धुरी यांनी केली. सापळे आणि धुरी हे सातोळी-बावळाट तिठ्यावर ड्युटीवर होते. त्यावेळी आंबोलीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू असताना रात्री पावणेतीन वाजण्याच्या सुमारास सावंतवाडीहून आजऱ्याच्या दिशेने जाणारा एक टाटा कंपनीचा निळ्या रंगाचा ४०७ टेम्पो आला. तो थांबवून पोलिसांनी त्याच्या मागील हौद्याची ताडपत्री उघडून पाहिली असता आत गाई दाटीवाटीने भरलेल्या आढळून आल्या. त्या टेम्पो चालकाकडे गुरे वाहतूक करण्याचा कोणताही परवाना नव्हता. सदर गाई आजरा येथे विकण्यासाठी घेऊन जात असल्याचे त्याने सांगितले. टेम्पोवर चालक गुरुनाथ तातू होडावडेकर (५०, रा. कामळेवीर-आडेली, ता. वेंगुर्ले) आणि क्लिनर अन्वर ईस्माईल खुल्ली (४०, रा. मुस्लिमवाडी पिंगुळी, ता. कुडाळ) होता. यावेळी आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे हवालदार दीपक शिंदे यांना या गुरांच्या अवैध वाहतुकीबाबत कळविण्यात आले. त्यांनी पोलीस नाईक मनिष शिंदे यांना सोबत घेत घटनास्थळी पंचनामा केला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

