चिरेखाणीत अपघाती मृत्यू पावलेल्या त्या चिमुरडीची दफन जागा सापडली

*चिरेखाणीत अपघाती मृत्यू पावलेल्या त्या चिमुरडीची दफन जागा सापडली*,

 

*उद्या काढला जाणार मुलीचा मृतदेह, न्यायालयाची परवानगी*.

 

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल ने टाकला प्रकाशझोत,सात दिवसांनंतर घटना उघडकीस*

 

सावंतवाडी –

मळेवाड येथील चिरेखाणीवर अपघाती मृत्यू पावलेल्या मुलीला ज्या ठिकाणी दफन करण्यात आले त्याची स्थळ पाहणी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी आज सकाळी घटनास्थळी जात केली असून पुढील कार्यवाही सुरू असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

5 ऑगस्ट च्या दरम्यान एक तीन ते पाच वर्षीय मुलगी शौचालयाला बसली असता जांभा दगडाने भरलेला टेम्पो मागे घेत असताना ड्रायव्हरला त्या मुलीचा अंदाज न आल्याने दगड भरलेल्या गाडी खाली ती मुलगी चिरडले गेली. यानंतर या घटनेची पोलिसात अपघाताची तक्रार देणे गरजेचे होते मात्र तसे न करता त्या मुलीच्या आई- वडिलांना परस्पर त्यांच्या गावी पाठवत मृत मुलीला एका माळरानावर खड्डा काढून जमिनीत दफन करण्यात आल्याची घटना मळेवाड येथील चिरेखाण व्यवसाय चालणाऱ्या खाणीलगत घडली आहे.

या संदर्भातले वृत्त कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल ने प्रसिद्ध करताच महसूल आणि पोलीस यंत्रणा सतर्क होत पोलिसांनी घटनास्थळी जात ज्या माळरानावर ज्या ठिकाणी मुलीला दफन करण्यात आले आहे. त्या जागेची पाहणी केली करून मृत मुलीचे आई-वडील किंवा नातेवाईक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर दफन केलेल्या मुलीचा मृतदेह बाहेर काढण्याची प्रक्रिया करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी माहिती दिली.

त्या मृत मुलीचे आई-वडील गावाहून निघाले असून उद्या सकाळपर्यंत मळेवाड येथे पोहोचणार आहेत. यानंतर पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू केली जाईल असेही पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी सांगितले. जमिनीत दफन केलेल्या मुलीचा मृतदेह काढण्यासाठी पोलिसांनी सावंतवाडी येथील दिवाणी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सदर अर्जाला अनुसरून दिवाणी न्यायालय सावंतवाडी यांनी मृत मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी परवानगी दिली असल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!