तालुक्यातील अवैध धंद्यावर तात्काळ कारवाई करा !
*🛑तालुक्यातील अवैध धंद्यावर तात्काळ कारवाई करा !*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴देवगड, दि-२२:-* देवगड तालुक्यातील गोवा बनावटीची दारू व अमली पदार्थ विक्री करणाऱ्या संशयितावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अन्यथा ठाकरे शिवसेना-युवसेना देवगड तालुक्याच्यावतीने पोलीस ठाण्यासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर यांनी देवगड पोलीस निरीक्षक यांना निवेदनाद्वारे दिला आहे. गावकर यांनी देवगड पोलीस स्थानकात महिला पोलीस हवालदार सी. अन्विता कदम यांच्याकडे निवेदन सादर केले. यावेळी बाळा कणेरकर, करंगुटकर उपस्थित होते. गावकर यांनी दिलेल्या निवेदनात
म्हटले आहे, देवगड तालुक्यातील बऱ्याचशा खेडेगावात व शहरी भागात मोठ्या प्रमाणावर गोवा बनावटीची दारू व अमली पदार्थ विक्री होत असून याची माहिती देवगड पोलिसांना वारंवार देण्यात आली आहे. परंतु संशयितावर कोणत्याही प्रकारची कठोर कारवाई केल्याचे निदर्शनास येत नाही. गोवा बनावटीच्या दारूमुळे व अमली पदार्थाच्या विक्रीमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. तरुण पिढी या अमली पदार्थाच्या व्यसनामुळे बरबाद होत आहेत. यावर तात्काळ कारवाई न केल्यास शिवसेना- युवसेना देवगड तालुक्याच्यावतीने पोलीस ठाण्यासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

