कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

परंधाम मठ – गुळदुवेत २२ ऑगस्ट रोजी सद्गुरु सदानंदाचार्य स्वामीजी पुण्यतिथी महोत्सव

*🛑परंधाम मठ – गुळदुवेत २२ ऑगस्ट रोजी सद्गुरु सदानंदाचार्य स्वामीजी पुण्यतिथी महोत्सव*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :मदन मुरकर*

*🎴सावंतवाडी, दि-२१:-* श्री दत्त पद्मनाभ पीठाच्या अखंडित सद्गुरु परंपरेतील ईश्‍वरी ज्ञानोपदेशक सद्गुरु सदानंदाचार्य स्वामीजींचा पुण्यतिथी महोत्सव श्री क्षेत्र परंधाम मठ, गुळदुवे सावंतवाडी- महाराष्ट्र येथे गुरुवार दि. २२ ॲागस्ट २०२४ रोजी, पीठाधीश्वर पद्मश्री सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या पावन सान्निध्यात संपन्न होणार आहे. श्री क्षेत्र परंधाम मठ – गुळदुवे येथे सकाळच्या सत्रात सौ व श्री ज्ञानदेव शेट्ये यांच्या यजमानपदाखाली पूज्य सद्गुरु समाधी स्थानी महापूजा, पूज्य सद्गुरू चरित्र वाचन, सौ व श्री दिनानाथ काळोजी यांच्या यजमानपदाखाली सद्गुरु भक्ति महायज्ञ, सौ व श्री संदेश शेट्ये यांच्या यजमानपदाखाली पूज्य सद्गुरु पूजन, सौ व श्री संतोष शेट्ये यांच्या यजमानपदाखाली श्री काशिविश्वेश्वर स्थानी रुद्राभिषेक व गुळदुवे पंचक्रोशीतील भजनी पथकाद्वारे पारंपारिक पार संपन्न होईल. तद्नंतर प्रकट कार्यक्रमात पूज्य सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींचे दिव्य आशीर्वचन होईल. सायंकाळी ठिक ७.०० वा. भजन, पालखी उत्सव व पूज्य सद्गुरु आशीर्वचन संपन्न होईल. कार्यक्रमाला रोम इटली येथील सुर्यचंद्र योग आश्रमचे संस्थापक महामंडलेश्वर शिवानंद सरस्वतीजी, अ‍ॅड्. ब्राह्मीदेवीजी, श्री दत्त पद्मनाभ पीठ – संचालक मंडळ, कृपाकांक्षी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित असणार आहेत.
तरी सर्वांनी पुण्यतिथी महोत्सवास मोठ्यासंख्येने उपस्थित राहून पूज्य सद्गुरुंचे आशीर्वाद प्राप्त करावेत असे आवाहन श्री दत्त पद्मनाभ पीठातर्फे करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!