कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

श्रमिक कामगार संघटनेचा कामगार यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात थेट मंत्रालय पातळीवर पाठपुरावा

*🛑श्रमिक कामगार संघटनेचा कामगार यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात थेट मंत्रालय पातळीवर पाठपुरावा*

*🛑श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांच्या आदेशानुसार मुंबई जिल्हाध्यक्ष राजेश सुसविरकर व ठाणे जिल्हाध्यक्ष अमोल बांबुळकर यांनी घेतली मुख्यमंत्री कार्यालय चे सचिव नितीन दळवी यांची भेट.*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :सुनील आचरेकर*

*🎴सिंधुदुर्ग, दि-२०:-* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगार यांच्या वार्षिक रीनिवल साठी लागणाऱ्या ग्रामसेवक दाखल्यावर ग्रामसेवक सही व शिक्का देत नाहीत. यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन कामगार वर्गावर होणारा अन्याय दूर करावा यासाठी पत्र दिले होते परंतु आजमिती पर्यंत कोणताही निर्णय देण्यात आला नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये 12 हजार पेक्षा वर कामगार नोंदणी आहे. सर्व कामगार ग्रामसेवक यांच्या आठमुठे पद्धतीमुळे सर्व योजना पासून मुकलेले आहेत. शासन योजना देते परंतु ग्रामसेवक संघटनेमुळे सही देत नाही त्यामुळे कामगार यांचा रोष मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. सदर विषयची तात्काळ दखल घेण्यासाठी श्रमिक कामगार संघटनेचे अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार ग्रामविकास मंत्री गिरीशजी महाजन, कामगार मंत्री सुरेश खाडे कामगार विभागचे प्रधान सचिव विनिता सिंगल तसेच बांधकाम कामगार सचिव विवेक कुंभार यांना मंत्रालय पातळीवर निवेदन देऊन लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा अशी मागणी केली आहे.मंत्रालय मधील मुख्यमंत्री कार्यालय सचिव नितीन दळवी व कामगार विभागचे सहसचिव थेटे साहेब यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करून घटना सांगितली चर्चा अंती या आठवड्यात कॅबिनेट बैठक आहे त्यावेळी आपणास कळविण्यात येईल व सदर विषयी सविस्तर चर्चा करण्यात येईल असे आश्र्वासित केले.तरी कामगार वर्गाच्या हितासाठी सदर निर्णय न झाल्यास कायदेशीर व सनदशीर मार्गाने 29-08-2024 रोजी कामगार ठिय्या आंदोलन करणार आहेत अशी माहिती श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!