कुडाळकोकणक्राइममहाराष्ट्र

एटीएम फोडणाऱ्या एकाच्या मुसक्या आवळल्या..

*🛑 एटीएम फोडणाऱ्या एकाच्या मुसक्या आवळल्या..*

*🛑 एलसीबी पथकाची कारवाई : मुंबई संशयित राजू आंबेकरला पकडले : कुडाळ मधील एटीएम फोडी प्रकरण..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कुडाळ, दि-२०:-* शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम लुटणाऱ्या टोळीतील पळून गेलेला संशयित राजू पांडुरंग आंबेकर (५३,रा. मुंबई ) याच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा (सिंधुदुर्ग) पथकाने विलेपार्ले – मुंबई येथे रविवारी मुसक्या आवळल्या. तसेच या गुन्हयात वापरलेली इनोव्हा कारही जप्त करण्यात या पथकाला यश आले. राजू याला कुडाळ पोलिसांच्या ताब्यात दिले असून त्याला अटक करण्यात आली. या गुन्ह्यातील कारसह पळून गेलेला
आणखी एक संशयित महम्मद शमशाद खान याच्या शोधात पोलीस आहेत. ११ ऑगस्ट रोजी पहाटे कुडाळ खरेदी – विक्री संघाच्या आवारात साधना बाजारच्यानजीक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्यात आले.
परंतु कुडाळ पोलिसांची चाहूल लागताच पळून जाताना अनिल अम्मीलाल बलोदाला
(२५, रा. राजस्थान) एटीएमच्या बाहेरच पोलिसांनी पकडले होते, तर तेथून पळून गेलेला वारिस जफरुद्दिन खान (२६, रा.राजस्थान) याला दुसऱ्या दिवशी पणदूर येथे पकडण्यात यश आले होते. मात्र, घटनास्थळावरून रस्त्याच्या बाजूला कार उभी करून टेहळणी करणारे आरोपी राजू आंबेकर व महम्मद खान या दोघांनी पोलीस वाहन पाहताच कारसह पळ काढला होता. या चोरीच्या गुन्ह्यातील पळून गेलेल्या आरोपीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण सिंधुदुर्ग शाखेचे पथक मुंबई येथे शोध घेत होते. सदर पथक गेले सतत सहा दिवस व रात्र मुंबई, वसई, विरार, ठाणे येथे पाळत ठेऊन आरोपी राजू आंबेकर याच्या विलेपार्ले – मुंबई (वेस्टनएक्सप्रेस हायवे – आंबेवाडी) येथे सापळा रचून अखेर त्याच्या मुसक्या आवळल्या.सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले, पोलीस हवालदार खंडे व प्रमोद काळसेकर, पोलीस नाईक चंद्रकांत पालकर व अमित तेली यांनी केली. तसेच या कारवाईमध्ये सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक हेमचंद्र खोपडे, उपनिरीक्षक सुरज पाटील व हवालदार भोसले यांनी तांत्रिकदृष्ट्या मदत केली.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!