वन कर्मचारी मदतनीस- ट्रकचालक यांच्यात हाणामारी
*🛑वन कर्मचारी मदतनीस- ट्रकचालक यांच्यात हाणामारी*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-१९:-* वन कर्मचाऱ्यांचा मदतनीस व – ट्रकचालक यांच्यात वादावादी व मारामारी झाल्याची घटना घडली. रविवारी उत्तररात्री घडलेल्या या प्रकाराबाबत कणकवली पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी व गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या दोन्ही तक्रारींमधील वेळ, ठिकाण व घटना या बाबी वेगवेगळ्या आहेत.
यातील सुशांत सुभाष चोरगे (३६, फोंडाघाट-हवेलीनगर) यांच्या फिर्यादीनुसार, सुशांत चोरगे हे फोंडाघाट चेकपोस्ट येथील वन कर्मचाऱ्यांना मदतनीस म्हणून काम करतात. सुशांत फोंडाघाट येथील एका हॉटेलमध्ये जेवत होते. त्यावेळी जळावू लाकूड भरलेला टक फोंडाघाटहून कोल्हापूरच्या दिशेने जात असल्याचे समजले. त्यांनी याबाबतची माहिती वन कर्मचारी अतुल खोत यांना कळविली. त्यानंतर अतुल खोत व सुशांत यांनी दुचाकीने जळावू लाकूडवाहतूक करत असलेल्या ट्रकचा पाठलाग सुरू केला. रात्री १.३० वा. सुमारास त्यांना कोंडये-तेलीवाडी येथे तो टक दिसला. ट्रक थांबवला असता आतमध्ये सुशांत यांच्या ओळखीचा असलेला सचिन सुभाष सावंत (२८, डामरे – साटमवाडी) दिसून आला. ‘सचिन याने ‘तू वन कर्मचाऱ्यांना बातम्या देतोस का?’ असे विचारून
सुशांत यांना दांड्याने डोक्यावर, पाठीवर, पायावर मारहाण केली. यात सुशांत यांच्या डोक्यातून रक्त येऊ लागले. वन कर्मचाऱ्यांनी मारामारी सोडवली. तर ‘पुन्हा माझ्याविरोधात बातम्या दिल्या तर तुला शिल्लक ठेवणार नाही.’ अशी धमकी देतानाच शिवीगाळ करून सचिन तेथून निघून गेला, असे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान जखमी सुशांत यांना उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालय व तेथून अधिक उपचारासाठी ओरोस जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सचिन सुभाष सावंत (२८, डामरे साटमवाडी) यांच्या फिर्यादीनुसार, सचिन घरी झोपलेले असताना रात्री १ वा. सुमारास त्यांच्या घराचा दरवाजा कुणीतरी वाजविला. सचिन यांनी दरवाजा उघडला असता, बाहेर सुशांत सुभाष चोरगे (३६, फोंडाघाट हवेलीनगर) उभा होता. सुशांत याने ‘मला तुझ्या गाडीवर चालक म्हणून कामाला ठेव.’ असे सचिन यांना सांगितले. त्यावर सचिन यांनी ‘तू एवढ्या रात्री कशाला आलास? चालक हवा असेल तेव्हा मी सांगेन.’ असे म्हटले. त्यावर सुशांत याने शिवीगाळ केली. त्याचवेळी सुशांत याने आत येऊन सचिन यांना लाथा बुक्क्यांनी, हाताच्या थापटाने मारहाण केली. तसेच ‘बाहेर भेट, तुझे हातपाय तोडतो.’ अशी धमकी देतानाच शिवीगाळ केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
