कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

मडुरा सजासाठी कायमस्वरूपी तलाठी देण्यासाठी प्रयत्न करणार

*🛑मडुरा सजासाठी कायमस्वरूपी तलाठी देण्यासाठी प्रयत्न करणार*

*🛑माजी आमदार राजन तेली यांच्या आश्वासनाअंती उपोषण स्थगित*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१७:-* मडुरा सजा साठी कायमस्वरूपी तलाठी नियुक्ती करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना आहे. यासाठी आम्ही पाठपुरावा करू. तसेच आठवड्यातील दोन दिवस मडुरा गावामध्ये तलाठी उपलब्ध होणार, असे आश्वासन सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिले. मात्र कायमस्वरूपी स्वतंत्र तलाठी देण्याच्या अटीवर मडुरा ग्रामस्थांनी छेडलेले उपोषण तात्पुरते स्थगित केले. मड्डुरा सजा साठी कायमस्वरूपी तलाठी मिळण्यासाठी मडुरा ग्रामस्थांनी सावंतवाडी तहसीलदार यांच्याकडे मागणी केली होती. तब्बल एक महिना ११ दिवस उलटूही मागणीची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आम्ही स्वातंत्र्यदिनी उपोषण छेडल्याचे उपसरपंच बाळू गावडे यांनी सांगितले. यावेळी सरपंच उदय चिंदरकर, माजी सरपंच विजय वालावलकर, मंडळ अधिकारी पी. एस. सावंत, प्रभारी तलाठी संदीप मुळीक, पोलीस पाटील नितीन नाईक, ग्रामपंचायत सदस्य अमोल मेस्त्री, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वालावलकर, सामाजिक कार्यकर्ते दाजी सातार्डेकर, सुशील मेस्त्री, ग्रामस्थ सुधीर नाईक, कोतवाल नाना वेंगुर्लेकर, बांदा पोलीस आदी उपस्थित होते.माजी आमदार राजन तेली यांनी सांगितले की, आपण मडुरा ग्रामस्थांसोबत असून त्यांच्या उपोषणाला आपला पाठिंबा आहे. तसेच मडुरा तलाठी कार्यालयासाठी स्वतंत्र तलाठी देण्याबाबत आपण स्वतः पाठपुरावा करणार असे आश्वासन मडुरा उपसरपंच बाळू गावडे यांना दिल्याचे त्यांनी सांगितले. तर उपोषणाला जिल्हा परिषद महिला बालकल्याण माजी सभापती शर्वाणी गावकर, कवठणी सरपंच अजित कवठणकर, शेर्ले माजी सरपंच उदय धुरी आदींनी भेट दिली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!