कोकणगोवाशैक्षणिक

सरकारी प्राथमिक विद्यालय थाटवाडा पोडोशे (सत्तरी – गोवा) शाळेत ७८ वा स्वातंत्र्य दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

*🛑सरकारी प्राथमिक विद्यालय थाटवाडा पोडोशे (सत्तरी – गोवा) शाळेत ७८ वा स्वातंत्र्य दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा*

*🛑विविध उपक्रम राबवित केला स्वातंत्र्य दिन साजरा*

*🛑झाडे लावा झाडे जगवा चा संदेश देत केले वृक्षारोपण*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :मदन मुरकर*

*🎴गोवा , दि- १६:-* सरकारी प्राथमिक विद्यालय थाटवाडा पोडोशे (सत्तरी – गोवा) शाळेत ७८ वा स्वातंत्र्य दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पर्यावरण प्रेमी ,साहित्यिक ,पर्यावरण अभ्यासक मा.श्री .सूर्यकांत गावकर,होंडा उपस्थित होते तसेच विशेष निमंत्रित म्हणून मोर्ले ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच ,समजसेवक,कावेरी मसाले उद्योजक मा.श्री .रामनाथ माईणकर , शाळेच्या अध्यक्ष सौ नीलिमा पोडस्कर उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते ध्वज पूजन आणि ध्वजारोहण करण्यात आले.मुलांनी राष्ट्रगीत आणि झेंडा गीत सादर करून वातावरण मंगलमय बनविलं,नंतर शाळेतील मुलांनी सुंदर अस देशभक्तीपर गीत सादर करून पालकांची आणि उपस्थितांची वाहवा मिळवली.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पाहुण्यांच्या हस्ते शाळेत झाडे लावा, झाडे जगवा चा संदेश देत वृक्षारोपण करण्यात आले .एक पेड देश के नाम उपक्रम राबविण्यात आला.त्या नंतर शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करण्यात आला.,
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती मातेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .शाळेतील शिक्षिका दीप्ती पेडणेकर यांनी उपस्थितांची ओळख करून दिली .त्यात मुलांनी छान सुंदर असे देशभक्ति पर गीत सादर केले. कु.विष्णू सावंत , कु.वर्षा गावकर आणि सर्वेश गावकर यांनी स्वातंत्र्य दिना निमित्त आपले विचार मांडले उपस्थित प्रमुख पाहुणे श्री सूर्यकांत गावकर यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात मुलांना मोलाचे मार्गदर्शन करताना सांगितले की, आपण पर्यावरणाचे संरक्षण केले पाहिजे तसेच चांगला अभ्यास करून आपल्या आई वडिलांचे,गुरुजनांचे शाळेचे नाव मोठे केले पाहिजे.तसेच श्री रामनाथ माईणकर यांनी शाळेसाठी झाडे दिली .त्यांनी मुलाना स्वातंत्र्य पूर्व काळातील काही महत्वाच्या गोष्टी मुलाना सांगून मार्गदर्शन केले .कार्यक्रमाची सर्व व्यवस्था शिक्षक श्री प्रभाकर वझे यांनी पाहिली तसेच कार्यक्रमाच्या शेवटी कु.पल्लवी घाडी यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले शेवटी मुलाना खाऊ वाटून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!