हर घर तिरंगा अभियानांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात स्वच्छता मोहिम
*🛑हर घर तिरंगा अभियानांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात स्वच्छता मोहिम*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-१६:-* बांदा येथील गोगटे- वाळके महाविद्यालयाच्या एन.सी.सी.विभाग आणि एन.एस.एस. विभागाच्यावतीने ” हर घर तिरंगा ” या मोहिमेंतर्गत”राष्ट्रभावना आणि देशसेवा ” ही मोहिम घेऊन बांदा- गडगेवाडी या परिसरातील रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या परिसरातील साफसफाई संबंधित विभागाच्या एन.सी.सी.कॅडेटनीं आणि एन.एस.एस.च्या स्वयंसेवकांनी सदर स्वच्छता मोहिम यशस्वीपणे येथे राबवली.पुतळा परिसरातील स्वच्छता मोहीम राबवताना या दोन्ही विभागाच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचालनाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांना अनोखी मानवंदना दिली. ” राष्ट्रपुरुषांच्या प्रेरणादायी विचारातून आजची युवा पिढी बोध घेत स्वतःच्या व्यक्तिमत्त्वात बदल घडवत असेल तर हे देशाच्या दृष्टिकोनातून सुचिन्ह आहे.आताची युवा पिढी सजग होत आहे याचे हे एक उदाहरण म्हणावे लागेल. अशा देशाभिमान व्यक्त करणा-या अभियानांतून खरा विद्यार्थी घडताना दिसतो.”असे प्रतिपादन गोगटे – वाळके महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गोविंद काजरेकर यांनी या मोहिमेला संबोधित करताना केले. या स्वच्छता मोहिमेत एन.सी.सी.आणि एन.एस.एस. विभागाच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.एन.एस.एस. विभागप्रमुख प्रा.रश्मी काजरेकर,क्रीडा विभाग प्रमुख डॉ.एस. बी.शिरोडकर डाॅ. के.के. म्हेत्री एन.सी.सी.विभाग प्रमुख प्रा.प्रसाद जाधव, प्रा.सुधीर न्हावेलकर डॉ.अनिल शिर्के यांच्या नियोजनाखाली सदर मोहिम राबविण्यात आली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

