Uncategorized

मडूऱ्यातील तलाठी कार्यालयासाठी स्वतंत्र कायमस्वरूपी तलाठ्याची नियुक्ती करा.

मडूऱ्यातील तलाठी कार्यालयासाठी स्वतंत्र कायमस्वरूपी तलाठ्याची नियुक्ती करा.

 

मडूरा उपसरपंच बाळू गावडे यांनी सावंतवाडी तहसीलदार याच्याकडे केली होती मागणी.

 

दखल न घेतल्यामुळे आज सरपंच उदय चिंदरकर यांच्यासह ग्रामस्थांनी छेडले उपोषण.

 

बांदा:प्रतिनिधी:शैलेश गवस

 

मडुऱ्यातील तलाठी कार्यालयासाठी स्वतंत्र कायमस्वरूपी तलाठ्याची नियुक्ती करावी अशी मागणी मडूरा उपसरपंच बाळू गावडे यांनी सावंतवाडी तहसीलदार यांच्याकडे केली होती.मात्र याची दखल न घेतल्याने आज स्वातंत्र्यदिनी मडूरा ग्रामपंचायत समोर सरपंच उदय चिंदरकर यांच्यासह ग्रामस्थांनी उपोषण छेडले,उपोषण कर्त्यानी सांगितले.

जिल्हा परिषद महिला बालकल्याण माजी सभापती शर्वानी गावकर,मडूरा सोसायटी माजी चेअरमन संतोष परब,यांच्यासह गावातील प्रतिष्ठित पदाधिकाऱ्यांनी उपोषण स्थळी भेट देत उपोषणाला पाठिंबा दर्शविला.

मडुरा सजा तलाठी कार्यालयांतर्गत मडुरा व पाडलोस ही दोन गावे येतात.अनेक शेतकऱ्याना सातबारा व आठची आवश्यकता आहे.परंतु कायमस्वरूपी तलाठी उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची मात्र गैरसोय होते.दोन तीन किलोमीटर अंतरावरून येणाऱ्या शेतकऱ्यांना तलाठी नसल्याने दिलेल्या दिवसाची वाट पहावी लागते.त्यामुळे मडुऱ्यासाठी स्वतंत्र तलाठी उपलब्ध करून घ्यावा अशी मागणी सावंवाडी तहसीलदार यांच्याकडे केली होती. मात्र याची दखल न घेतल्याने आज उपोषण छेडावे लागले आहे असे मडुरा उपसरपंच बाळू गावडे यांनी सांगितले.

जोपर्यंत कायमस्वरूपी तलाठी नियुक्ती संदर्भात प्रशासनाकडून ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार.दुपारी 12 वाजेपर्यंत महसूल विभागाकडून कोणताही वरिष्ठ अधिकारी आला नव्हता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!