बेळणे येथील गडनदित वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह सापडला..

 

*सिंधुदुर्ग*

 

मालवण तालुक्यातील रामगड बेळणे कुंभारवाडी येथील युवक राहुल कृष्णा जिकडे वय १८ हा गळाने मासे पकडण्यासाठी गुरुवारी दुपारी गड नदीत गेला असता तो वाहून गेला होता याचा मृतदेह तिसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घटनास्थळापासून सुमारे पाचशे मीटर अंतरावर नदीपात्रात आढळून आला ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार राहुलला गळाने मासे पकडण्याचा छंद होता तो स्वतःमासे खात नव्हता अतिशय हुशार म्हणून राहुल ओळखला जात होता बारावीनंतर हॉटेल मॅनेजमेंट साठी कणकवली येथे यांनी प्रवेश घेतला होता सात वर्षांपूर्वीच वडिलांचे छत्र हरपल्याने याच्या आईने कष्टाने याला सांभाळले होते गुरुवारी सकाळी तो आला नाही म्हणून राहुलच्या आईने आणि बहिणीने याचा सर्वत्र शोध घेतला पण तो आढळून आला नाही ही बाब ग्रामस्थांना कळल्यावर श्रावण राठिवडे अजगणी ग्रामस्थांनी नदीपात्र शोध मोहीम राबवली होती गुरुवारी न सापडल्याने शुक्रवारी पुन्हा शोधाशोध केली पण शुक्रवारी सकाळपर्यंत तो आढळून आल्याने याची खबर प्रशासनाला देण्यात आली त्यानंतर एनडीआरएफ टीमला प्राचारण करून साधारण अडीच किलोमीटर परिसरात शोधाशोध करण्यात आली पाऊस पडत असल्याने नदीचे पाणी गडूळ असल्याने तसेच पाण्याचा प्रवाहाला प्रचंड वेग असल्याने याचा शोध घेण्यात अडचणी येत होती शुक्रवारी सायंकाळी मालवण येथील स्कुबा ड्रायव्हिंग टीमला पाचारण करून बेळणे नदीपात्रात शोधमोहीम राबवली होती घटनास्थळी आचरा पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार मंडल अधिकारी अजय परब पोलीस कर्मचारी बबन पडवळ सुदेश तांबे मनोज पुजारे रामगड तलाठी यू एम वजराटकर ठाण मांडून होते रामगड सरपंच शुभम मठकर पोलीस पाटील नारायण जिकडे सुरेंद्र कांबळे अविनाश सादरे विष्णू कळमकर सुमेश साधे महेश पारकर बंटी जाधव आदी ग्रामस्थांनी येथे राहुल मासे पकडण्यासाठी गेल्या होत्या याठिकाणी शोध मोहीम सुरू केली साधारण घटनास्थळापासून अंदाजे पाचशे मीटर अंतरावर खडकाची कोंड येथे १०.३० वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांना राहुल जिकमडे यांचा मृतदेह आढळून आला . राहुलच्या अकस्मात निधनाने संपूर्ण रामगड गावावर शोकोकळा पसरली आहे याच्यापेक्षा आई आणि दोन बहिणी याचा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!