आणखी

बांदा – दाणोली मार्गावर वाफोली येथील नळ पाणी योजना विहिरी जवळील पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य.

बांदा – दाणोली मार्गावर वाफोली येथील नळ पाणी योजना विहिरी जवळील पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य.

 

वाहन धारक जीव मुठीत धरून करत आहेत प्रवास.

 

तत्काळ खड्डे बुजवून मार्ग सुरळीत करा अन्यथा १५ ऑगस्टला सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर ग्रामस्थांसह आंदोलन छेडणार.

विलवडे सरपंच प्रकाश दळवी यांचा इशारा.

 

बांदा:प्रतिनिधी:शैलेश गवस

 

बांदा – दाणोली मार्गावर वाफोली नळ पाणी योजनेच्या विहिरीजवळ

गत वर्षी प्रमाणे यंदाही निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला व पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.वाहन धारकांना खड्ड्यात रस्ता शोधावा लागत आहे.तसेच वाहन धारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.अनेक वेळा खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने छोटे मोठे अपघात घडून प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.पावसाळ्याच्या सुरुवातीलाच भले मोठे खड्डे पडल्यामुळे सदर रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. वाहन धारक संबंधित विभागाच्या विरोधात नाराजी व्यक्त करत आहेत.वर्षा पर्यटनासाठी मोठ्या संख्येने पर्यटक याच मार्गाचा अवलंब करत असतात.संबंधित विभागाने तत्काळ सदर रस्त्यावरील खड्डे बुजवावेत अन्यथा १५ ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर ग्रामस्थांसह आंदोलन छेडणार असल्याचे विलवडे सरपंच प्रकाश दळवी यांनी सांगितले आहे.

भविष्यात या ठिकाणी अपघात घडून कोणतीही जीवितहानी झाल्यास संबंधित विभाग व ठेकेदार सर्वस्वी जबाबदार राहील असे सरपंच श्री दळवी, स्थानिक वाहन धारक व ग्रामस्थांचे सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!