राजकीयवैभववाडीशासकीयसिंधुदुर्ग

सेनेच्या पालकमंत्री यांची विकासाला पैसे कमी पडू देणार नसल्याची वल्गना; भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली

▪️निवडणुकीत जिल्हावासियांनी ग्रामपंचायती सेनेकडे का द्याव्यात; तेली यांचा सवाल

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी,दि.१२: जिल्हा विकासाचा आराखडा २२५ कोटी वरून १४३ कोटी वर आणला. तरीही सेनेचे पालकमंत्री विकासाला पैसे कमी पडू देणार नाही अशी वल्गना करत आहेत. विकास निधीला कात्री लावून कोकणावर राग नेमका कोणी काढला. सेनेने की राष्ट्रवादीने. मुख्यमंत्री, पालकमंत्री व खासदार सेनेचे असताना जिल्ह्यात विकास कामांना खीळ बसली आहे. मग या निवडणुकीत जिल्हावासियांनी ग्रामपंचायती सेनेकडे का द्याव्यात. असा सवाल भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केला आहे. भाजपात विकासाची धमक नाही म्हणता मग वारंवार भाजपवर बोलता कशाला. खासदार नारायण राणे यांच्यावर वारंवार होत असलेली टीकाटिपणी ही मातोश्रीला खुश ठेवण्यासाठीच अशी टीकाही श्री. तेली यांनी केली.

वैभववाडी भाजपा पक्ष कार्यालयात राजन तेली यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी तालुकाध्यक्ष नासीर काझी, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, अरविंद रावराणे, भारती रावराणे, राजेंद्र राणे, सुधीर नकाशे, बंड्या मांजरेकर, बाबा कोकाटे, बाळा हरयाण, किशोर दळवी, उदय पांचाळ, विश्राम राणे आदी उपस्थित होते. तेली म्हणाले, चांदा ते बांदा ही योजना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरू केली होती. चंद्रपुर जिल्ह्यात ही योजना यशस्वीपणे राबविण्यात आली. मात्र माजी पालकमंत्री केसरकर योजना राबविण्यात अपयशी ठरले. त्याचबरोबर या योजनेतील उरले सुरले पैसेही अजित पवार घेऊन गेले असा आरोप तेली यांनी केला.

जिल्ह्याला भात नुकसानीसाठी २० कोटी गरज असताना केवळ २९ लाख रक्कम आली आहे. शेतकऱ्यांना गुंठ्यांला केवळ ६८ रुपये मिळणार आहेत. ते पैसे तलाठ्यांच्या कागदपत्रांना तरी पुरतील का? असा सवाल त्यांनी केला आहे. मेडिकल कॉलेज कधीही सुरू करा. परंतु जिल्ह्यातील अगोदर ५३६ डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भरा. सावंतवाडीतील मल्टीपर्पज हॉस्पिटलचे दोन वेळा दिपक केसरकर यांनी भूमिपूजन केले. तरीही होवू शकले नाही. मग मेडिकल कॉलेजवर विश्वास कसा ठेवायचा. जिल्ह्याची गरज ओळखून आदरणीय नारायण राणे यांनी मेडिकल कॉलेज सुरू केले आहे. ते पैसे कमवण्यासाठी नाही. याबाबत राजकारण करून सेना कॉलेज सुरू करण्याची घोषणा करत आहे. हे इतकं सोपं असेल तर त्यांनी आधी रत्नागिरीत कॉलेज सुरू करावे. भाजपची मदत नसती तर लोकसभेत सेनेचे चित्र वेगळे दिसले असते. विधानसभेत मात्र सेनेने गद्दारी केली. व भाजपा नेत्यांचे फोटो लावले. मात्र भाजपने युतीचा धर्म पाळला. अपक्ष उमेदवार असतानाही भाजपाने सेनेचा घाम फोडला. जर ती निवडणूक कमळ चिन्हावर असती तर भाजपनेच जिंकली असती. सेनेत एवढी हिंमत असेल तर त्यांनी आज राजीनामे द्यावे. असे सांगितले. चिपी विमानतळं हे माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या माध्यमातूनच झाले आहे. सेनेने फक्त गणपती आणायचे काम केले. या प्रकल्पाचे श्रेय केवळ भाजपचे असे सांगितले. तेली पुढे म्हणाले, जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायत पैकी ६० ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकणार आहे. या निवडणुकीत महाआघाडी केवळ नावापुरती आहे. सेनेवाले राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेसचे प्रचारात नाव ही घेत नाही. एकही जागा त्यांना दिली नाही. त्या दोन पक्षांनी याचा विचार करावा. जि. प. निवडणूकीतही भाजप ५० पैकी ४५ जागा जिंकणार आहे. वैभववाडी, दोडामार्ग नगरपंचायत भाजपच जिंकणार. याची झलक बांदा, सावंतवाडी आंब्रड मध्ये पहायला मिळाली असल्याचे तेली यांनी सांगितले.

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता  कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये  फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!