श्री राम मंदिर “निधी समर्पणा”त भाजपा कार्यकर्त्यांनी सर्वतोपरी योगदान द्यावे; भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचे आवाहन..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : विश्राम वारंग
🎴कुडाळ,दि.१२: श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्रासाठी निधी संग्रह महाभियान योजना देशभरात राबवली जात आहे. राष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या या श्रीरामरुपी राष्ट्रमंदिराचे निर्माण हे अतिभव्य असावे या दिशेने वाटचाल होत आहे. भव्य मंदिरासोबतच या ठिकाणी संग्रहालय, ग्रंथालय, ३६० अंशातले अँफीथिएटर, यज्ञशाळा, धर्मशाळा, संमेलनकेंद्र, सत्संग भवन, अभिलेखागार, संगीत कारंजे, अतिथी भवन, तीर्थयात्री सुविधा केंद्र, प्रदर्शनी आदी उपक्रमांची भव्य निर्मिती होणार आहे. प्रत्येक भारतवासीयांच्या अस्मितेचे प्रतिक असलेल्या या मंदिर निर्माणासाठी देशभरातील प्रत्येक परिवाराचा हात असावा, त्याचे त्याच्या परीने काहींना काही योगदान असावे या हेतूने किमान चार लाख गावांपर्यंत, ११ करोड कुटुंबांपर्यंत यातून पोहोचायचे या अभियानाला अभिप्रेत आहे. किमान दहा रुपयांपासूनची कुपने यासाठी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मकर संक्रात ते माघ पौर्णिमेपर्यन्त म्हणजेच १५ जानेवारी ते २७ फेब्रुवारी २०२१ पर्यंत चालणाऱ्या या अभियानात सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी गावागावातुन सहभागी व्हायचे आहे, असे आवाहन भाजपा सिंधुदुर्ग जिल्ह्याध्यक्ष राजन तेली यांनी केले आहे.
*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

