सिंधुदुर्गातील मजूर संस्था नामधारी..अधिकारी आणि संस्था अध्यक्षांचे रॅकेट

*🛑*सिंधुदुर्गातील मजूर संस्था नामधारी..अधिकारी आणि संस्था अध्यक्षांचे रॅकेट*

*🛑करोडो रुपयांची कामे मजूर संस्थांच्या नावे काढून -वाटून खातात मलिदा*

*🛑दरवर्षी चतुर्थी काळात रस्ते दुरुस्ती, साफसफाई चा निधी केला जातोय गिळंकृत*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ संपादकीय – सीताराम गावडे*

*🎴सिंधुदुर्ग, दि-१०:-* कौशल्य आणि अनुभव आवश्यक असणारी कामे ही मजूर संस्थाना देऊ नयेत असा नियम आहे तसेच मजूर संस्थांना कामे देत असताना ३ लाख वारिल रक्कमेची कामे ही स्पर्धात्मक व्हावीत या साठी इ निविदेने सादर करणे इतर कंत्राटदार प्रमाणे मजुर संस्थांना बंधनकारक आहे, परंतु आज पर्यंत मजूर संथेची कामे ही फेडरेश तर्फे वाटप करण्यात येत असून त्यात फेडरेशन अध्यक्ष हा कामाच्या १ टक्का घेवून ही कामे वाटप करतो असे ठेकेदारांमध्ये बोलले जात आहे,तसेच मजूर संस्था कधीही स्पर्धात्मक निविदा सादर करत नाहीत …या उलट सुभे व कंत्राटदार यांची कामे स्पर्धात्मक होत असून अंदाजपत्रकापेक्षा कमी दराने होतात त्यात शासनाचा आर्थिक फायदा होतो व कामे सुद्धा लायक कंत्राटदार लाच मिळत असतात , जसे की बिड capacity , यंत्रसामुग्री कामाचा अनुभव, ई. मुळे लायक कंत्राटदार ला कामे मिळून कामांचा दर्जा राखण्यात बऱ्याच प्रमाणात यश मिळते. परंतु मजूर संस्था ना मिळणारी कामे ही मुख्यता ही वाढीव दराची असल्याने कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो ……उदा. रस्त्यांच्या दुरुस्त्या , शासकीय निवास्थानची दुरुस्ती , शासकीय इमारतींची दुरुस्ती , शासकीय कार्यालयांची दुरुस्ती ही कामे मुख्यता मजूर संस्थांना वळवली जातात कारण ह्या कामात काम कमी आणि मलिदा मोठ्या प्रमाणात शासकीय अधिकाऱ्यांना मिळत असतो याबाबत सखोल चौकशी झाल्यास हे सर्व पुराव्यानिशी सिद्ध होईल. त्यात शासकीय अधिकारी , शाखा अभियंता हेच मजूर संस्था च्या नावावर बेनामी ठेकदारी करत असल्याची बाब कायमच अधोरेखित होते …..परंतु यात सर्वांची तक्षिम असल्यामुळे तेरी भी चूप मेरी भी चूप करीत सर्वजण मलिदा गोळा करण्यात व्यस्त आहेत. तसेच अशी कामे भौतिक दुष्ठ्या २० ते ३० टक्के होत असून ७० ते ८० टक्के कामे कागदावर पूर्ण दाखवून सर्व शासकीय निधी अधिकाऱ्यांच्या खिशात जात आहे,त्यामुळे शासकीय अधिकारी आज करोडो रुपये मिळवत आहेत.सध्या सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत गणेश चतुर्थी पूर्वी अतिवृष्टी मुळे रस्त्यांची होणारी दुर्दशा टाळण्यासाठी काही वार्षिक देखभाल दुरुस्ती अंतर्गत निधी मंजूर केला आहे असे समजते तसेच असा निधी दर वर्षी मंजूर करण्यात येतो ,परंतु ही कामे कधी पूर्ण होताना दिसत नाही, मुख्यता ही कामे त्या त्या विभागातील शाखा अभियंता मजूर संस्था मार्फत घेऊन कामे केल्याचे भासवून सर्व शासकीय निधी आपल्या खिशात घालतो, त्यामुळे आपले रस्ते कधीच वाहतुकीस योग्य राहत नसून त्याचा त्रास सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागतो.यामुळे रस्ता अपघातात मृत्युमुखी पडून कित्येक जणांचे संसार उध्वस्त झाले आहेत. जो उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून मजूर संस्था स्थापन झाल्या आहेत त्याला बगल देत ….मजूर संस्था चालवणारे एजंट आणि शासकीय अधिकारी मोठ्या प्रमणात भ्रष्ठाचार करीत आहेत यासाठी सर्व कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे गरजेचे आहे तसेच ऑडिट करणारी कमिटी ही त्यांचीच असल्यामुळे ऑडिट करणारी कमिटी ची पाकिटे चौकशी होण्या अगोदरच पोहोच केली जातात त्यामुळे निरपेक्ष चौकशी कशी होईल या साठी शासनाने योग्य ते पाऊल उचलावीत अशी आमची रास्त मागणी आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!