महाराष्ट्रवेंगुर्ले

वेंगुर्ला तालुका बुथ अध्यक्ष यांची बैठक

*🛑वेंगुर्ला तालुका बुथ अध्यक्ष यांची बैठक*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴वेंगुर्ला, दि-०९:-* राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची वेंगुर्ला तालुका बुथ अध्यक्ष यांची बैठक कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ अर्चना घारे-परब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोमाने तयारीला लागा, संघटना मजबूत करा असे आवाहन सौ. घारे यांनी उपस्थितांना केले. वेंगुर्ला येथील बैठकीत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी तालुक्यातील कार्यकर्त्यांकडून पक्षप्रवेश करण्यात आला. वेंगुर्ला तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वेंगुर्ला तालुका बुथ अध्यक्ष यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटना मजबूत करण्याबाबतच्या सुचना सौ. घारे यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या. तसेच पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीच आवाहन केल. आगामी विधानसभा निवडणुकीसह होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या नियोजनाबद्दलच मार्गदर्शन सौ. घारे यांनी उपस्थितांना केले. याप्रसंगी तालुक्यातील अनिल चुडजी, विलास चुडजी, संजय चुडजी, दिनेश चुडजी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. सौ. अर्चना घारे-परब यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश घेण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षा नम्रता कुबल, तालुकाध्यक्ष योगेश कुबल, शहराध्यक्ष सत्यवान साटेलकर, महिला अध्यक्षा दिपीका राणे, युवक अध्यक्ष शुभम नाईक, युवती अध्यक्षा अदिती चुडजी, सलिल नाबर, सुहास कोळसुलकर, अवधूत मराठे, स्वप्निल राऊळ, बबन पडवळ, ऋतिक परब आदींसह बुथ अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!