अवकाळीच्या भरपाईसाठी मंजूर निधीत कोकणचा समावेश नाही..
*🛑 अवकाळीच्या भरपाईसाठी मंजूर निधीत कोकणचा समावेश नाही..*
*🛑नुकसानीचा प्रस्ताव सादर होऊनही कार्यवाही शून्य*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-०९:-* यावर्षी मेमध्ये झालेल्या चक्रीवादळात सिंधुदुर्गातील नागरिकांचे, शेतकऱ्यांच्या मालमत्ता व फळपिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. मात्र, याची भरपाई अद्याप नागरिक, शेतकऱ्यांना मिळालेली नाही. परंतु दुसरीकडे राज्यात जानेवारी ते में २०२४ या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईसाठी ५९६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मात्र, यात कोकण विभागाचा समावेश नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यावर्षी अचानक आलेल्या चक्रीवादळात मेमध्ये जिल्ह्यात सर्वत्र हाहाकार माजला होता. अनेक ठिकाणी घरांची मोठी पडझड झाली. घरांवरील छप्परे उडून गेली. मोठ्या प्रमाणात झालेल्या या नुकसानीने ऐन पावसाळ्याच्या तोंडावरच गोरगरीब शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. राजकीय पक्षांनी त्यांना थोडीफार मदत केली असली, तरी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भार सहन करावा लागला. एकट्या कणकवली तालुक्याचा विचार केला, तर या चक्रीवादळात मे महिन्यात नागरिकांचे तब्बल ७२ लाखांहून अधिक रकमेचे नुकसान झाल्याचे पंचनामे करण्यात आले
होते. जिल्ह्यातील १०० हेक्टर क्षेत्रावरील फळपिकांचे नुकसान झाले होते. जिल्हाभरातून नुकसानग्रस्त शेतकरी, नागरिकांच्या मालमत्तांचे पंचनामे करून त्याबाबतच्या रिचार्ज भरपाईचा अहवाल कोकण आयुक्तांमार्फत शासनाला सादर करण्यात आला होता. ५९६ कोटी रकमेचा समावेश
दरम्यान, २ ऑगस्ट २०२४ रोजी शासनाने काढलेल्या आदेशानुसार जानेवारी ते मे २०२४ या कालावधीत अवेळी पावसामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीबाबतची भरपाई जाहीर करण्यात आली आहे. यात ५९६ कोटी एवढ्या रकमेचा समावेश आहे. नाशिक, पुणे, नागपूर येथील विभागीय आयुक्त याच्याकडून प्राप्त प्रस्तावानुसार ही भरपाई जाहीर करण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्यातही याच कालावधीत चक्रीवादळ व पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मंजूर करणे आवश्यक होते. परंतु अद्यापही ही भरपाई जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकरी वर्गातून प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
