उद्यानविद्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून निसर्गातील वस्तूंपासून शोभिवंत वस्तू बनविण्याचे मार्गदर्शन
*🛑उद्यानविद्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून निसर्गातील वस्तूंपासून शोभिवंत वस्तू बनविण्याचे मार्गदर्शन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*
*🎴सावंतवाडी, दि-०९:-* श्री कुलदेवता विद्या मंदिर मळेवाड शाळा नं .२ येथील विद्यार्थ्यांना निसर्गात मिळणाऱ्या नैसर्गिक वस्तूंपासून शोभिवंत वस्तू कशा प्रकारे बनिवेले जातात या बाबत मार्गदर्शन देण्यात आले. यावेळी मुलांनी सुद्धा प्रात्यक्षिक करून चांगल्या वस्तू बनविल्या.
उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे मधील ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम सन २०२४- २५ अंतर्गत श्री कुलदेवता विद्यामंदिर शाळा नं २ मळेवाड येथे घेण्यात आला . यावेळी शोभिवंत झाडांचा पुष्पगुच्छ , Miniature Garden आणि Terrarium यांचे प्रात्यक्षिक शाळेतील विद्यार्थ्यांना करून दाखविण्यात आले.
शाळेतील विद्यार्थ्यांना आपल्या आसपासच्या परिसरातील नारळ , सुपारी व शोभिवंत झाडांची पाने , फुले , यांचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारे सर्जनशील वस्तू तयार करून दाखवण्यात आल्या. Miniature Garden मध्ये गावाकडील वस्ती या प्रकारचे वास्तू चित्र दाखवण्याचा प्रयत्न केला.
तसेच कमी जागे मध्ये सर्जनशील वस्तू कशा कराव्यात यासाठी Terrarium चे प्रात्यक्षिक करून दाखवले. त्या साठी आपल्या दगडांवर येणारी शेवाळ, रंगेबीरंगी दगड, माती, वाळू याचा वापर करून काचेच्या बरणीत Terrarium साकारण्यात आले.
शाळेतील विद्यार्थिनींनी आपल्या कलाकृतीला वाव देऊन शोभिवंत झाडांपासून पुष्गुच्छ तयार करून दाखविले.इतर विद्यार्थ्यानी उत्साह दाखवत आपल्या कलाकृती मध्ये भर टाकुन चांगला अनुभव आत्मसात केला. या कार्यशाळेला उपस्थित शाळेतील मुख्याध्यापक,शिक्षक वर्ग व कर्मचारी यांनी चांगले मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेला मुळदे महाविद्यालयाचे विद्यार्थी ध्रुव मालडीकर, संचित तांबट, अल्पेश वाळके , शशांक साळुंखे, प्रदीप चौधरी , अभिषेक अनाप, अंकित गवाणकर उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

