जिल्ह्यातील सर्व मजूर सोसायटींची चौकशी होणे गरजेचे,,संस्था चेअरमन करोडपती -मजूर भिकारी
*🛑जिल्ह्यातील सर्व मजूर सोसायटींची चौकशी होणे गरजेचे,,संस्था चेअरमन करोडपती -मजूर भिकारी*
*🛑हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्याच मजूर संस्था करताहेत कामे*
*🛑नोंदणी कामगाराचे वार्षीक उत्पन्न तपासावे*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्ग, दि-०९:-* मजूर सहकारी संस्थांच्या बळकटी करणासाठी शासनाने विना निविदा १० से ५० लाखापर्यंतची कामे देण्याचा निर्णय घेतला खरा, परंतु सध्या हा निर्णय वादात सापडला आहे. बहुतांश सर्वच संस्थाचालक व पदाधिकारी लाखोच्या महागड्या गाड्या घेऊनच जिल्ह्या परिषदेत , सार्वजनिक बांधकाम विभागात कामे मॅनेज करण्यासाठी येऊ लागले आहेत तसेच मजूर फक्त कागदावरच दाखवले जात असून, दुसऱ्याच ठेकेदाला कमीशन घेऊन कामे विकली जात आहेत व ही कामे परराज्यातील मजुरांमार्फत केली जात आहेत. यामुळे ‘बोगस’ कामे थांबवण्याचे आव्हान जि.प.व सार्वजनिक बांधकाम विभागा समोर निर्माण झाले आहे.जिल्हा परिषद व सामाजिक बांधकाम विभागांकडून गावागावांत विकासकामे केली जातात. ही कामे राज्यातील मजूर संस्थेला देण्याचा निर्णय शासनाने घेतला, त्यानुसार विना निविदा १० ते ५० लाखांपर्यंत कामे देण्यात येत आहेत. तसेच वर्षभरात तब्बल दीड कोटी रुपयांची कामे संस्थेला देण्याची तरतूद आहे. मात्र, याबाबत आढावा घेतला असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. विशेष म्हणजे मजूर संस्थांची योजना ही भ्रष्टाचाराचे मुख्य स्त्रोत बनल्याची चर्चा सध्या सुर आहे.कोणतीही पात्रता नसताना महत्त्वाची बांधकामाच्या निविदा बांधकाम विभागाचे अधिकारी मजूर संस्थांना देत आहेत. बांधकाम विभागाकडून एखादे काम जर विना अट हवे असेल तर मजूर संस्था हा सध्या सोयीचा मार्ग झाला आहे. यातूनच टक्केवारीचा खेळ सुरू झाला आहे जिल्ह्यात जेवढ्या मजूर संस्था आहेत त्यापैकी जवळपास ८० टक्के या बोगस असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. या संस्थेतील मजूर सदस्य हे फक्त कागदावरच असल्याचे दिसून येत आहे. तेथील एकही सदस्य कोणतेही काम स्वतः करत नाही आणि करु शकत नाही. कारण मजूर संस्थेचे चेअरमन व सदस्य हेच मुळात लाखोपती य करोडपती आहेत हे वारंवार दिसून आले आहे. जिल्हा परिषदेत व सार्वजनिक बांधकाम विभागात येताना हे चेअरमन व सदस्य लाखो रुपयांच्या महागड्या गाड्यामधून येताना दिसतात. सध्या जिल्ह्यात जी कामे सुरू आहेत हे परजिल्ह्यातील परराज्यातील कामगार आणून केली जात असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. शासनाने बांधकाम करायचे झाल्यास पात्र ठेकेदारांना अनुभव लागतो, स्वतःची यंत्रसामग्री लागते, अद्यावत स्टाफ लागतो पण, मजूर संस्थांना अशा प्रकारची कोणतीही अट लागत नाही जिल्ह्यातील सर्व मजूर संस्थांची सध्या सखोल चौकशी करणे गरजेचे आहे. मजूर संस्थांमधील मजूर प्रत्यक्षात काम करत नाहीत. पण ती कामे कोणामार्फत केली जातात? सध्या मजूर संस्थांमध्ये मजूर सदस्यांचे वार्षिक उत्पन्न कीती आहे? प्रत्यक्ष जागेवर काम करतेवेळीचे छायाचित्र उपलब्ध आहे का? याची चौकशी करणे गरजेचे आहे. एकंदरीत जिल्ह्यातील मजूर संस्थांच्या नावाखाली बोगस कामांचा सुळसुळाट सुरु असल्याची चर्चा सुरु आहे. यामुळे ही बनावट कामे थांबवण्याचे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे कोकण आयुक्त कार्यालयात तक्रार…मजुराच्या हाताला काम मिळावे, हे यामागचे प्रमुख उद्दिष्ट आहे. परंतु संस्थेचे मजूर काम करत नसून बोगस कामगार विशेषतः परजिल्हा व परराज्यातील काम करत आहेत. यामुळे स्थानिकांना काम मिळत नाही. यामुळे सर्व मजूर संस्थांची चौकशी करावी, अशी मागणी आपण कोकण आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे करणार असल्याची माहिती सुभे सिव्हिल इंजिनिअर यांनी दिली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

