महाराष्ट्रसावंतवाडी

डेगवे येथील शासकीय वनात खैराची चोरतोड करणाऱ्या गुन्हेगारांवर डेगवे ग्रामस्थांच्या मदतीने वन विभागाची कारवाई

*🛑डेगवे येथील शासकीय वनात खैराची चोरतोड करणाऱ्या गुन्हेगारांवर डेगवे ग्रामस्थांच्या मदतीने वन विभागाची कारवाई*

*🛑डेगवे ग्रामस्थांनी वनसंरक्षणासाठी दिलेल्या कौतुकास्पद सहकार्यासाठी सावंतवाडी वन विभागाने मानले आभार*

*🛑तोड करणारे दोन्ही आरोपी मौजे-तळवडे, ता.सावंतवाडी येथील*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-०९:-* सावंतवाडी वन परिक्षेत्राच्या अखत्यारीत असलेली मौजे डेगवे येथील शासकीय वनसर्व्हे क्रमांक-84, 85 मध्ये रात्रीच्या वेळी अपप्रवेश करून खैरझाडाची तोड करून वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना काल रात्री 12 वाजता, डेगवे ग्रामस्थांचा मदतीने वन विभागाने रंगेहात ताब्यात घेतले. याबाबत सविस्तर मी महिती अशी की, डेगवे तांबोळी रत्यावरील शासकीय जंगलात रात्रीच्या वेळी अपप्रवेश करून, खैर झाडाची कटरच्या सहाय्याने तोड करून त्याची वाहतूक करण्याचा तयारीत असल्याचा सुगावा डेगवे येथे राहणाऱ्या श्री.शंकर देसाई या तरुणाला लागताच त्यांनी तात्काळ इतर गावकरी मंडळी व वन विभाग यांना याबाबत माहिती दिली. सावंतवाडी वन परिक्षेत्राची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. उपस्थित ग्रामस्थ व वनअधिकारी यांनी सापळा रचून शासकीय वनात तोड करणाऱ्या दोन आरोपींना ताब्यात घेतले. सदरच्या आरोपींची नावे ही, 1) महेश मोहन मालवणकर (वय-29 वर्षे, रा.तळवडे- म्हाळाईवाडी, ता.सावंतवाडी) तसेच, 2) दौलत अशोक गोडकर (वय-20 वर्षे, रा.तळवडे, ता.सावंतवाडी) अशी आहेत. आरोपींनी सोबत आणलेल्या कटर मशीन, बॅटरी, तोड केलेल्या खैर झाडाचा माल तसेच सोबत आणलेली दोनचाकी गाडी (MH-07-AN-3337) देखील ताब्यात घेण्यात आली. सदर आरोपींना अटक करण्यात आलेली असून आज दुपारी सावंतवाडी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. डेगवे ग्रामस्थ यांनी आपले गावचे शासकीय जंगल संरक्षित करून टिकवून ठेवण्यामध्ये, वन विभागाला वेळोवेळी सहकार्य करून, मोलचा वाटा उचललेला आहे. दरवेळी प्रमाणे या कारवाईमध्ये देखील जंगल संरक्षणासाठी डेगवे ग्रामस्थांनी दाखवलेल्या सजगतेबद्दल तसेच गावातील जंगलात चोरतोड कारणाऱ्या आरोपींना पकडून देण्यामध्ये मोलाचा वाटा उचलल्या बद्दल सावंतवाडीचे वनपरिक्षेत्र अधिकारी मदन क्षीरसागर यांनी उपस्थित डेगवे ग्रामस्थ, पदाधिकारी यांचे आभार मानले. तसेच वन विभागाला वेळेत बातमी देऊन सहकार्य करणाऱ्या श्री.शंकर देसाई या तरुणाचा वन विभागाकडून बक्षीस देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी डेगवे गावचे सरपंच श्री.राजन देसाई, माजी सरपंच श्री.मधुकर देसाई, पोलिस पाटील श्री.अरविंद देसाई, ग्रा.सदस्य श्री. राजेश देसाई,बातमी देणारे श्री.शंकर देसाई व इतर ग्रामस्थ मंडळी घटनास्थळी उपस्थित होते. यासोबतच या कारवाई मध्ये पर्यावरणप्रेमी असलेली युनियन बँक-शिरोडा शाखेचे बँक व्यवस्थापक श्री. अजिंक्य घोडके यांनी देखील वन विभागाला मोलाचे सहकार्य केले. सदरची कारवाई ही, मा.उपवनसंरक्षक सावंतवाडी श्री. एस नवकिशोर रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक डॉ. सुनिल लाड यांचे मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी मदन क्षीरसागर, वनपाल-प्रमोद सावंत, पृथ्वीराज प्रताप, वनरक्षक-संतोष मोरे, दत्तात्रय शिंदे, अप्पासो राठोड, सागर भोजने, संग्राम पाटील व डेगवे ग्रामस्थ व पदाधिकारी यांनी पार पाडली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!