मोडून पडलं घर तरी मोडला नाही कणा….!
*🛑मोडून पडलं घर तरी मोडला नाही कणा….!*
*🛑भर पावसात घर कोसळलेल्या आंबडगावच्या शेतकऱ्याच्या पाठीवर हात ठेवत विशाल परब यांनी दिली लढण्याची हिंमत*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-०५:-* गेला महिनाभर कोकणात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोकणातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. अनेक लोकांच्या घरात पुराचे पाणी घुसल्याने लोकांची दैना उडाली आहे. दोडामार्ग येथील शेतमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या एका सामान्य शेतमजुराचे घर भर पावसात कोसळले. आकाशाइतकाच भीतीदायक अंधार मनात पसरला असताना सावंतवाडीचे युवा नेतृत्व, भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब पूरपरिस्थितीतील दोडामार्ग तालुक्यात पोहोचले. त्या शेतमजूराला धीर देत त्याला तातडीच्या डागडुजीसाठी लागणारी आर्थिक मदतही त्यांनी केली.
दोडामार्ग तालुक्यातील रामा यशवंत उसपकर यांची परिस्थिती हलाखीची आहे. त्यातच भर पावसात घर कोसळले आणि संकटाने कहर केला. दोडामार्ग तालुक्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी त्याची स्थिती विशाल परब यांच्या कानावर घातली. गोरगरिबांची कणव असलेल्या या युवा नेतृत्वाने तातडीने त्याठिकाणी धाव घेतली. निसर्गाने झोडपले, पण भाजपाने सावरले असा अनुभव आज उसपकर कुटुंबियांना आला. मोडून पडलं घर तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा अशा आत्मविश्वासाने रामा उसपकर पुन्हा एकदा भाजपा कार्यकर्त्यांच्या आणि संवेदनशील भाजपा नेते विशाल परब यांच्या तातडीच्या मदतीमुळे सावरत आहेत. लवकरच शासकीय मदतीसाठी त्यांचा प्रस्ताव पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार प्रशासनाकडे सुपूर्द केला जाणार असल्याची माहिती विशाल परब यांनी दिली. यावेळी भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्यासमवेत दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, माजी भाजपा तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस, पराशर सावंत, माजी तालुकाध्यक्ष प्रविण गवस, दिपक गवस, सरपंच देवेंद्र शेटकर, क्षाणी बोडेकर, विठोबा गवस, भिवा गवस, नाना गवस, हरिश्चंद्र गवस, अंकुश गवस, सुमती चिडकर, पांडुरंग गवस, बजरंग गवस, किशोर नाईक, नितू गवस, बुध अध्यक्ष भिवा नाईक, मुकूंद गवस, सर्वेश गवस, समीर रेडकर, बाळू गवस, खडपकर आदी भाजपा पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

