“भगवा सप्ताह” खाली कणकवली विधानसभे ची प्रथम बैठक कळसुली जि. परिषद येथून सुरु – जिल्हाप्रमुख संदेश पारकर
*🛑”भगवा सप्ताह” खाली कणकवली विधानसभे ची प्रथम बैठक कळसुली जि. परिषद येथून सुरु – जिल्हाप्रमुख संदेश पारकर*
*🛑भगवा सप्ताह अंतर्गत गाव तेथे प्रचार कमीटी नेमणार – युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :प्रथमेश जाधव*
*🎴कणकवली, दि-०५:-* शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी जाहिर केल्याप्रमणे संपुर्ण महाराष्ट्रामध्ये भगवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने कणकवली विधानसभे मध्ये कळसुली जिल्हा परिषद येथे भगवा सप्ताह ची प्रथम बैठक पार पडली.कणकवली विधानसभा मतदार संघातून कळसुली येथून भगवा सप्ताह ची सुरवात करण्यात आली. कळसुली जिल्हा परिषद च्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आळी. यामध्ये असे ठरवण्यात आले की प्रत्येक गावात प्रचार कमेटी नेमून, ज्या ठिकाणी रिक्त पदे असतील त्या ठिकानी पदाधिकारी नेमण्यात येणार असल्याचे ठरवण्यात आले. येत्या कणकवली विधानसभे वरती भगवा फडकवन्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. याप्रसंगी जिल्हाप्रमुख संदेश पारकर, शिवसेना नेते अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक हे उपस्थित होते. यावेळी जिल्हाप्रमुख संदेश पारकर म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी जाहिर केल्याप्रमाणे आपण कणकवली मतदार संघात भगवा साप्ताहची सुरवात कळसुली जिल्हा परिषद येथून करत आहोत, जिल्हाप्रमुख म्हणून मी कणकवली विधानसभा मतदार संघात मालवण मध्ये भगवा सप्ताह सुरु करण्यासाठी जे काही प्रयन्त करावे लागतील ते आपण करूया व येत्या कणकवली विधानसभेवर भगवा फडकवण्यासाठी आपण सर्व जण सज्ज होऊया. पदाधिकाऱ्यांच्या बैठका गाव वार पूर्ण करण्याची जबाबदारी पक्षाचे महत्वाचे नेते असतील तालुका प्रमुख असतील यांची असेल. शिवसेना सभासद नोंदनी 50 हजार चा संकल्प देखील आपण करत आहोत, हा संकल्प पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी पर्यंत केले पाहिजेत. झालेल्या प्रराभवाचे शल्य न घेता येत्या विधानसभे वर भगवा फडकवूया. यावेळी अतुल रावराणे यांनी देखील मार्गदर्शन केले, मागच्या विधानसभेच्या वेळी कमी कालावधीत कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत ही वाखण्य जोगी होती. ते मतदान उद्धव साहेबांवर विश्वास ठेऊन व तुम्ही घेतलेल्या मेहनतिमुळे मिळाली होती, त्याचउलट समोरच्यांना जे मतदान मिळाले आहे ते 100 कोटी च्या धनशक्ती वर मिळालेली मते होती, त्यामुळे येत्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात भगवा फडकवण्यासाठी आपण झटून काम करून उद्धव साहेबांचे हात बळकट करूया. युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक म्हणाले की, काही जिल्हा परिषद ह्या वाटून दिल्यामुळे त्यात कळसुली जिल्हा परिषद ची जबाबदारी माझ्या वर असल्यामुळे ही बैठक प्रथम आपण घेत आहोत, गावा-गावात मशाल चिन्ह पोहचून, प्रत्येक गावात आपला पदाधिकारी सक्षम होईल या दृष्टीने काम करणे गरचेजे आहे. येत्या विधासभेसाठी गाव वार प्रचार कमेट्या नेमून एक प्रचार यंत्रणा तयार करण्याची जबाबदारी, आमच्या वर देण्यात आली आहे,या अनुषंगाने भगवा सप्ताहच्या खाली आपण प्रत्येक गावात प्रचार कमेटी टयार करून या विधानसभे वर भगवा फडकवण्यासाठी आपण जि मेहनत आता पर्यंत घेत आलो आहोत, त्यापेक्षा जास्त मेहनत घेऊन फक्त विधानसभेसाठीच नाही तर ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या मध्ये देखील भगवा फडकवण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी सज्ज झाले पाहिजे. यावेळी जिल्हाप्रमुख संदेश पारकर, शिवसेना नेते अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, विभागप्रमुख चंदू परब, युवासेना उपजिल्हाप्रमुख ललित घाडीगावकर, रुपेश आमडोस्कर, रवि सावंत, उपतालुका प्रमुख राजू राणे, युवासेना विभागप्रमुख रोहित राणे, ग्रामपंचायत सदस्य नंदू परब, उपविभाग प्रमुख महादेव राठोड, बाबू कुलकर्णी, रमाकांत राणे,नितीन धुरी आदी कळसुली जिल्हा परिषद येथील पदाधिकारी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

