केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला कर्नाटकात भीषण अपघात
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला भीषण अपघात पत्नी व स्वीय सहाय्यक जागीच ठार
पणजी : केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला भीषण अपघात अपघातातपत्नी सौ.विजया श्रीपाद नाईक आणि सचिवाचा मृत्यू,तर श्रीपाद नाईक गंभीर जखमी उत्तर कर्नाटकातील अंकोला येथे भीषण अपघात झाला.
चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने दुर्घटना
उत्तर गोव्याचे खासदार तथा केंद्रीय आयूषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या वाहनाला अंकोला येथे भीषण अपघात झाल्याची बातमी धडकली आहे. या अपघातात त्यांच्या पत्नी सौ.विजया श्रीपाद नाईक आणि निजी सचिव ठार झाल्याची माहिती असून श्रीपाद नाईक हे गंभीर जखमी आहेत. यल्लापूरा येथे हा अपघात झाल्याची खबर आहे. माजी खासदार अ ड. नरेंद्र सावईकर यांनी भाऊंच्या आरोग्यासाठी प्रार्थना करणारे ट्वीट केले आहे. या अपघाताची नेमकी माहिती अद्याप मिळालेली नाही. ते गोकर्ण येथे जात होते, अशी खबर आहे. त्यांना तत्काळ गोव्यात जीएमसीत आणण्याची तयारी सुरु असल्याचे समजते. गोमेकॉत डॉक्टरांचे पथक तयार ठेवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी अपघाताबाबत संपर्क केला आहे.

