कोकण

… अन्यथा १५ ऑगस्ट ला करणार तीव्र उपोषण

… अन्यथा १५ ऑगस्ट ला करणार तीव्र उपोषण || नेमळे ग्रामस्थांचा इशारा

 

 

नेमळे कार्यक्षेत्रात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होत असुन नाहक ग्रामस्थांचे जीव जात असुन अनेक कुटुंबे निराधार होत आहे. सदरची होणारे अपघात थांबविण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावर उपाय योजना करणे बाबत यापूर्वी मे महिन्यात निवेदन देण्यात आले होते मात्र कोणतीच कार्यवाही होत नसल्याने आज नेमळे ग्रामस्थांनी कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले आहे या निवेदनात असे म्हटले आहे की,ग्रामपंचायत हद्दीत नेमळे तिठा ते गावकर कुंभारवाडी ते एरंडवाकवाडी पर्यंत सर्विस रस्ता करण्यात यावा जेणेकरून शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यायेण्यासाठी ट्रॅक्टर किंवा इतर जनावारे गाई, म्हैशी, बैलजोडी जाण्यासाठी त्रास होणार नाही. तसेच शाळेत जाणारे मुले व इतर ग्रामस्थांना जाण्यायेण्यासाठी मुंबई गोवा मार्गावर जाण्याची आवश्यकता भासणार नाही तसेच ग्रामपंचायत कार्यालय नेमळे कार्यक्षेत्रातील सर्व सर्कलवर सिग्नल व्यवस्था करण्यात यावी तसेच सि.सि टी. व्ही कॅमेरा बसविण्यात यावे.नेमळे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात नेमळे गावंकर कुंभारवाडी ते एरंडवाकवाडी राष्ट्रीय महामार्गावर सौरउर्जा करण्यात यावी.नेमळे गावकर कुंभारवाडी व एरंडवाकवाडी येथे सर्कल करण्यात यावे व सर्विस रोड करण्यात यावा व तेथे सिग्नल व रिफलेक्टर बसबावे. तरी वरिल प्रमाणे उपाय योजना करणेस विनंती आहे.नेमळे तिठा ते एरंडवाकवाडी पर्यंत दिशादर्शक फलक बसवण्यात यावे.वरीलप्रमाणे सुचविण्यात आलेली कामे आपले कार्यालयाकडून पूर्ण न झाल्यामुळे आम्ही ग्रामस्थ दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी आपल्या कार्यालयासमोर उपोषणाचा मार्ग अवलंब करणार आहोत. असा इशारा नेमळे ग्रामस्थांनी दिला आहे यावेळी सरपंच दिपीका भैरे, उपसरपंच तुकाराम राऊळ,माजी उपसरपंच विक्रम पांगम, ग्रामपंचायत सदस्य आरती राऊळ, सचिन मुळीक, सागर राऊळ,परशुराम राऊळ, लीलाधर राऊळ, गवस गुरुजी,विष्णू चव्हाण, श्रीकांत नाणोसकर,नितीन पांगम आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!