गणेशोत्सव स्पेशल रेल्वेगाड्यांचे थांबे वाढविले
*🛑गणेशोत्सव स्पेशल रेल्वेगाड्यांचे थांबे वाढविले*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-०२:-* गणेशोत्सवात गावी येऊ इच्छीणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वे प्रशासनाने आतापर्यंत तब्बल १८ विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. या गाड्यांना थांबेही भरपूर आहेत. मात्र, चाकमान्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी विशेष गाड्यांपैकी सात गाड्यांचे थांबे वाढविण्यात आले आहेत. हे थांबे पेण आणि सिंधुदुर्गातील झाराप या स्थानकावर देण्यात आले आहेत. यात सीएसएमटी-सावंतवाडी- सीएसएमटी डेली (०११५१ / ०११५२) या गाडीला पेण आणि झाराप, सीएसएमटी-रत्नागिरी- सीएसएमटी डेली (०११५३ / ०११५४) या गाडीला पेण, एलटीटी-कुडाळ-एलटीटी डेली (०११६७ / ०११६८) या गाडीला पेण, एलटीटी-कुडाळ-एलटीटी त्रिसाप्ताहिक (०११८५ / ०११८६)
गाडीला पेण, एलटीटी-कुडाळ- एलटीटी साप्ताहिक (०११६५ / ०११६६) गाडीला पेण, एलटीटी- सावंतवाडी-एलटीटी डेली (०११७१ / ०११७२) गाडीला पेण आणि झाराप, आठवड्यातून सहा दिवस धावणाऱ्या मुंबई सेंट्रल-सावंतवाडी- मुंबई सेंट्रल (०९००९ / ०९०१०) या गाडीला झाराप स्थानकावर थांबा देण्यात येणार आहे. दरम्यान, गणेशोत्सव स्पेशल गाड्यांपैकी रत्नागिरी-सीएसएमटी डेली (०११५४) ही गाडी १ ते १८ सप्टेंबर या कालावधीत धावणार होती. मात्र, ही गाडी २ ते १९ सप्टेंबर या कालावधीत धावणार आहे. तसेच कुडाळ-एलटीटी डेली (०११६८) ही गाडी १ ते १८ सप्टेंबर या कालावधीत धावणार होती. ही गाडीही २ ते १९ सप्टेंबर या कालावधीत धावणार असल्याची माहितीही रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

