सकल मराठा समाज-कुणकेरी यांच्या कडून मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज जरांगे पाटील यांचा वाढदिवस 100 झाडांचे वृक्षारोपण करून साजरा
*सकल मराठा समाज-कुणकेरी यांच्या कडून मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज जरांगे पाटील यांचा वाढदिवस 100 झाडांचे वृक्षारोपण करून साजरा.*
संपूर्ण महाराष्ट्रात मराठा संघर्ष योद्धा श्री. मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आले त्याचप्रमाणे सकल मराठा समाज कुणकेरी, सावंतवाडी यांच्या माध्यमातून मराठा संघर्ष योद्धा श्री. मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला. येथील कुणकेरी येथील स्मशानभूमी व हुड्याच्या परिसरात सामाजिक उपक्रम म्हणुन सोनबहावा, साग, रातांबा, सीमारुबा जातीची 100 रोपांची लागवड करण्यात आली.
यावेळी श्री. प्रमोद सावंत [माजी सभापती पंचायत समिती], श्री.विश्राम सावंत [माजी सरपंच कुणकेरी], श्री. मंगेश सावंत, श्री. महेश सावंत, श्री. मनोज घाटकर, श्री. कैलास परब, श्री.आत्मेश सावंत, श्री. रविन्द्र सावंत, श्री. विजय सावंत, श्री. प्रकाश घाटकर, कु. बाळकृष्ण गो. सावंत, कु. प्रविण परब, श्री. बाळू मेस्त्री उपस्थित होते.